प्रकरण-7
प्रासंगिक / नैमित्तिक करारावर बसची
मागणी
प्रवाशांना लग्न, धार्मिक कार्य, सहल,
इत्यादि कारणांसाठी गटाने प्रवास
करण्याकरिता स्वतंत्र बस उपलब्ध करुन
देण्याची सुविधा 'नैमित्तिक करार'
या योजनेअंतर्गत निर्माण करण्यांत
आलेली आहे. या सुविधेचा लाभ समाजातील
सर्व घटक मोठया प्रमाणावर घेत आहेत. प्रासंगिक कराराची सुविधा ही एकेरी व
दुहेरी प्रवासाकरिता उपलब्ध करुन
देण्यांत आलेली आहे.
प्रासंगिक करारावर बसची मागणी करावयाची
झाल्यास इच्छूक प्रवाशाने संबंधित /
नजीकच्या आगार कार्यालयाशी संप साधून
प्रासंगिक कराराचा मार्ग, कराराचा
कालावधी इत्यादि तपशील सादर केल्यास,
इच्छूक प्रवाशास प्रासंगिक करारापोटी
महामंडळाकडे जमा करावयाची आगाऊ
रक्कमेची माहिती प्राप्त होऊ शकते.
इच्छूक व्यक्तीने सदरची माहिती
प्राप्त करुन घेतल्यानंतर त्यास
प्रासंगिक करारावर बस नोंदणी करावयाची
असल्यास, विहीत नमुन्यातील मागणी अर्ज
संपूर्ण तपाशीलासह आगार व्यवस्थापक
यांचेकडे सादर करणे आवश्यक आहे.
तद्नंतर, सदर अर्जास आगार व्यवस्थापक
यांची संमती प्राप्त झालेनंतर
मागणीकर्त्याने प्रासंगिक कराराच्या
रक्कमेचा भरणा रोकड शाखेत करुन
नैमित्तिक करारावर बस नोंदवून त्यापोटी
आगाऊ रक्कम जमा केल्यानंतर त्यास पावती
देण्यांत येते. प्रासंगिक करारासाठी आगाऊ रक्कम
निश्चित करताना कि.मी., खोळंबा आकार,
अतिकालीक भत्ता, इत्यादीनुसार येणाऱ्या
रक्कमेवर 20%
अधिक रक्कम आकारणी करण्यांत येऊन
येणारी रक्कम आगाऊ भरणा रक्कम म्हणून
निश्चित करण्यांत येते.
नैमित्तिक करारासाठी प्रवासी गर्दीच्या
हंगामानुसार दर ठरविण्यात आलेले आहेत.
हंगामाचा कालावधी पुढीलप्रमाणे -
1. गर्दीचा हंगाम - 1 मार्च ते 30 जून
2. कमी गर्दीचा हंगाम - 1 जुलै ते
28/29 फेब्रुवारी
|
खोळंबा आकाराचे दर:-
(प्रति बस, प्रति तास)
बसप्रकार |
गर्दीचा हंगाम |
कमी गर्दीचा हंगाम |
|
साधी (मिनी बससह) |
100 |
65 |
|
निम आराम |
130 |
130 |
|
आराम / डिलक्स |
165 |
165 |
|
वातानुकूलीत |
245 |
245 |
एकेरी फेरीकरिता सर्व साधारणपणे
खोळंबा आकार आकारण्यांत येत नाही.
अपवादात्मक स्थितीत सदर आकार
आकारावयाचा झाल्यास, वरील दराने
आकारणी करण्यांत येते. नैमित्तिक
कराराच्या एकूण कालावधीत दिलेल्या
बसेसची सरासरी धाव प्रतिदिन 300
कि.मी. पेक्षा अधिक झाल्यास, खोळंबा
आकार व चालकांचा अतिकालीक भत्ता
आकारण्यांत येत नाही. 20 आसनी मिनी
बसकरिता प्रतिदिन 400 कि.मी. पेक्षा
अधिक धाव झाल्यास, खोळंबा आकार व
अतिकालीक भत्ता आकारण्यांत येत नाही.
अन्यथा वरील दराने खोळंबा आकार
आकारण्यांत येतो.
टिकमान आकार किंवा करार रद्द करावयाचा
आकार
नैमित्तिक करारावर घेण्यांत
येणा-या बसेसकरिता आकारणी
करावयाचे किमान दर तसेच करार
रद्द करावयाचा झाल्यास,
आकारावयाचे दर पुढीलप्रमाणे
आहेत.
|
बसप्रकार |
प्रती बस दर |
|
साधी (मिनी बससह) |
रु.1200/- |
|
निम आराम |
रु.1700/- |
|
आराम / डिलक्स |
रु.1800/- |
|
वातानुकूलीत |
रु.2100/- |
टिकमान आकार म्हणून फक्त कि.मी. आकार
ग्राहय धरण्यांत येतो. त्याशिवाय
नियमानुसार येणारा खोळंबा आकार व
अतिकालीक भत्तासुध्दा आकारण्यांत
येतो.
आगार व्यवस्थापक किंवा नैमित्तिक
करारावर बस देण्यांस सक्षम अशा
अधिका-याकडे अनामत रक्कमेचा भरणा करुन
कराराची नोंद केल्या दिवसापासून करार
पार पाडावयाच्या नियोजित दिवसाच्या
वेळेपर्यंत पक्षकारास केव्हाही करार
रद्द करता येईल व त्यावेळी उपरोक्त
दराप्रमाणे करार रद्द करण्याचा आकार
वसूल करण्यांत येईल. मात्र करार रद्द
करण्याबाबत पक्षकाराकडून काहीच कळविले
गेले नाही व पक्षकाराच्या जागेवर बस
जाऊन परत आल्यास त्याच्या अनामत रक्कमेतून करार रद्द करण्याचा आकार
आणि बस जाऊन परत येण्यासाठी झालेला
कि.मी.चा आकार मिळून येणारी रक्कम
वसूल करण्यांत येते. बसमध्ये अधिक
प्रवाशी बोजा झाल्यास, बस
भाडयाने घेणा-याला जादा प्रवाशी
बोजा बद्दल दुहेरी फेरीसाठी 61 पैसे
तर एकेरी फेरीसाठी रु.1.21 प्रती
कि.मी. प्रती प्रवाशी आकारण्यांत
येतो. परंतु, अंतीम आकारणी रु.1/-
च्या पटीत करण्यांत येते. याशिवाय
पूर्वपरवानगी न घेतल्यास सक्षम
अधिका-याने बसविलेला दंड ही भरावा
लागतो. टिमनी बसेसची क्षमता 20
आसनांची असून त्या साध्या बसच्या
प्रकारात मोडत असल्याने मोटार वाहन
नियमानुसार या बसमध्ये 25%
जादा प्रवाशी अर्थात 5 जादा प्रवाशी
नेता येतील त्यासाठी वेगळा आकार
घेण्यांत येत नाही. परंतु, 25 पेक्षा
जास्त प्रवाशी आढळल्यास प्रत्येक
वाढीव प्रवाशास प्रती कि.मी., प्रती
प्रवाशी वरीलप्रमाणे जादा आकार
आकारण्यात येतो. तसेच पक्षकारास
नियमानुसार दंड ही भरावा लागतो.
आंतरराज्य नैमित्तीक करार
आंतरराज्य मार्गावरील प्रासंगिक
कराराकरिता संबंधित राज्यातील मोटार
वाहन कर, प्रवासी कर व इतर अनुषंगिक
करांचा भरणा काही राज्यांकरिता आगाऊ
करणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे
प्रासंगिक कराराकरिता आंतरराज्य
मार्गांवर द्यावयाच्या बसेसचा तपशील
आगाऊरित्या परिवहन विभागास कळविणे
आवश्यक असल्याने आंतर राज्य मार्गावर
प्रासंगिक करार करावयाचा असल्यास,
नागरिकांनी आगाऊ नोंदणी करणे आवश्यक
आहे. मोटार वाहन व इतर कराबाबतची
माहिती संबंधित आगार व्यवस्थापक
यांचेकडे उपलब्ध आहे. त्यांचेशी संप
साधावा.
आसनक्षमतेच्या 25%
प्रवासी मोफत नेण्याची सवलत
प्रासंगिक करारावर नोंदविलेल्या
बसेसच्या आसनक्षमतेपेक्षा 25% अधिक
प्रवासी कोणताही अधिक आकार अदा न करता
मोफत नेण्याची मुभा देण्यांत येते.
प्रासंगिक करार कर्त्याने नोंदविलेल्या
तारखेस व वेळेस नोंदविलेल्या संख्येने
बसेस महामंडळाकडून उपलब्ध करुन
देण्यांत येतात. प्रासंगिक कराराचे
दरपत्रक व इतर अन्य महत्वाच्या तरतूदी
पुढीलप्रमाणे आहेत.
1. प्रासंगिक / नैमित्तिक कराराच्या
साध्या बसेसमधून बस आसनक्षमतेच्या 25%
जादा प्रवासी विनामूल्य नेण्याची सवलत
प्रासंगिक करार कर्त्यास देण्यात आलेली
आहे.
2. नैमित्तिक कराराचे कालावधीत
नैमित्तिक करारावर घेतलेल्या सर्व
प्रकारच्या गाड्यांचे प्रति बस दैनिक
सरासरी 300 पेक्षा अधिक आकारणीय कि.मी.
झाल्यास पक्षकारास फक्त कि.मी. च्या
आकारणीत 2 टक्के सूट देण्यात येते.
3. आगार ते प्रवासी घेण्याचे ठिकाण
यातील जाऊन - येऊन होणारे प्रत्यक्ष
अंतर व 20 कि.मी. यापैकी जे अंतर कमी
असेल त्या अंतराची एकूण कि.मी.मधून
वजावट करुन उर्वरित कि.मी. वर दर
आकारणी केली जाते. त्यासाठी सरासरी
300 कि.मी.पेक्षा जास्त आकारणीय कि.मी.
झाले पाहिजेत.
4. नैमित्तिक करारावर घेतलेल्या बसच्या
दिवसाची गणना 00.00 ते 24.00 अशी केली
जाते. पक्षकाराने नैमित्तिक करारावर
घेतलेली बस रात्रीच 2.00 वाजेपर्यंत
केव्हाही परत केल्यास तो दिवस गणला
जात नाही. त्यासाठी सरासरी 300
कि.मी.पेक्षा जास्त आकारणीय कि.मी.
झाले पाहिजेत.
5. नैमित्तिक कराराच्या कालावधीत
सरासरी दैनिक 300 आकारणीय कि.मी.पेक्षा
जास्त अंतराचा नैमित्तिक करार केल्यास
खोळंबा आकार व चालकाचा अतिकालिक भत्ता
पक्षकाराकडून वसूल केला जात नाही.
अ) कायम स्वरुपी -नैमित्तिक
करारावर घेण्यात येणा-या गाडयांच्या
दराबाबत.
कारखाने,कार्यालये, खाजगी कंपन्या
अशाकडून मासिक अथवा आठवडा कालावधीकरिता
सुटटीचे दिवस सोडून नैमित्तिक करारावर
साध्या गाडयांची मागणी आली तर अशा
नैमित्तिक करारासाठी आकारावयाचे दर हे
गदीुच्या हंगामाकरिता दरानुसार
संपूर्ण वर्षासाठी आकारण्यात येतात.
6. बसेसच्या आसन क्षमतेपेक्षा कमी
आसनाचा नैमित्तिक करार करता येतो.
परंतु, या करारात 25% जादा प्रवासी
विनामूल्य नेता येत नाहीत. करार
केलेल्या आसन क्षमतेएवढेच प्रवासी नेता
येतात. किमान 40 आसनाचा आकार अदा करणे
आवश्यक आहे. ( मिनीबस वगळून)
7. शैक्षणिक सहलीसाठी विद्यार्थी /
विद्यार्थीनींकरिता 50% कि.मी. दरात
सवलत देण्यात येते.
नैमित्तिक कराराचे सद्या अस्तित्वात
असलेले दर खालीलप्रमाणे आहेत.
|
बसची आसन
क्षमता |
प्रति कि.मी. चा दर |
फ़क्त दुहेरी फ़ेरीच्या
कराराबाबत विद्यार्थां साठी(रुपये) |
|
१ मार्च ते ३० जून गर्दीचा
हंगाम |
१ जुलै ते २८ फ़ेब्रुवारी कमी
गर्दीचा हंगाम |
|
एकेरी फ़ेरीचा करार (रुपये) |
दुहेरी फ़ेरीचा करार (रुपये) |
एकेरी फ़ेरीचा करार (रुपये) |
दुहेरी फ़ेरीचा करार (रुपये) |
|
साध्या गाड्या ४० आसनापर्यंत
(२० आसनी मिनी बस वगळून)
४१ ते ५० आसने
५१ ते ५५
आसने
५६ ते ६०
आसने |
34.00
43.00
47.00
51.00 |
19.00
24.00
27.00
29.00 |
32.00
40.00
44.00
48.00 |
18.00
23.00
25.00
27.00 |
09.50
12.00
13.50
14.50 |
|
निमआराम
४०
आसनापर्यंत
४१ ते ४५ आसने
४६ ते ४९
आसने |
41.00
46.00
50.00 |
23.00
26.00
28.00 |
दोन्ही हंगामात सारखे |
दोन्ही हंगामात सारखे |
सवलत नाही |
|
डिलक्स/आराम सेवा
२४
आसनापर्यंत
२५ ते ३८ आसने
३९ ते ४०
आसने
४१ ते ४५
आसने |
36.00
57.00
60.00
67.00 |
20.00
32.00
34.00
38.00 |
दोन्ही हंगामात सारखे |
दोन्ही हंगामात सारखे |
सवलत नाही |
|
वातानुकुलित
३६
आसनापर्यंत
३७ ते ४०
आसनापर्यंत
४१ ते ४५
आसनापर्यंत |
93.00
102.00
114.00 |
52.00
58.oo
65.00 |
दोन्ही हंगामात सारखे |
दोन्ही हंगामात सारखे |
सवलत नाही |
|
२० आसनी मिनी बस (साधी सेवा) |
27.00 |
15.00 |
दोन्ही हंगामात सारखे |
दोन्ही हंगामात सारखे |
सवलत नाही |