msrtc home msrtc about us msrtc services msrtc rti msrtc news msrtc contact
 

Citizen's Charter: Chapter-5

प्रकरण -5

प्रवाशांना एस.टी. सेवेकडे आकर्षित करण्याकरिता प्रवासभाडे सवलत योजना

अलिकडील कालावधीत जागतिकीकरण, मुक्त अर्थव्यवस्थेचा परिणाम सर्व व्यावसायिक क्षेत्रावर दुरगामी, आमुलाग्र होत असून प्रत्येक व्यावसायिक क्षेत्रात तीव्र स्पर्धा निर्माण झालेली आहे. या बदलत्या व्यावसायिक परिस्थितीची दखल महामंडळाने घेतलेली असून महामंडळाने प्रवासी हा केंद्रबिंदू ठेऊन प्रवासी / ग्राहकवर्गास पूर्ण समाधान देण्याच्या हेतूने महामंडळाचे धोरण निश्चित केलेले आहे. या धोरणाचाच एक भाग म्हणून महामंडळाने व्यावसायिक तत्वावर आधारित प्रवास भाडे सवलत योजना सुरु केलेल्या आहेत.

रा.प.महामंडळाचे प्रवास भाडे दरपत्रक स्पर्धात्मक व्हावे आणि अन्य माध्यमांद्वारे रस्ता प्रवास करणारा प्रवासीवर्ग महामंडळाकडे आकर्षित व्हावा या हेतूने महामंडळाने प्रवाशांच्या गरजा, आवडी - निवडी विचारात घेऊन व्यवसायिक तत्वावर आधारित प्रवास भाडे सवलत योजना सुरु केलेल्या आहेत. या प्रवास भाडे सवलत योजनांची तपशिलवार माहिती पुढीलप्रमाणे :-

1. त्रैमासिक पास योजना : 45 दिवसांचे परतीचे भाडे आकारुन 3 महिने प्रवास. 50% प्रवासभाडे सवलत देण्यात येते.

2. मासिक पास योजना : 20 दिवसांचे परतीचे भाडे आकारणी करुन 30 दिवस प्रवास योजना. - 33.33% सवलत देण्यात येते.

3. वार्षिक सवलत कार्ड योजना : रु.200मूल्य असलेल्या कार्डवर साधी व निमआराम बसेससाठी वर्षभर 10% प्रवासभाडे सवलत देण्यात येते.

4.आवडेल तेथे प्रवास योजना : ठराविक कालावधीसाठी सलग प्रवास करणा-या प्रवाशांना केंद्रिभूत ठेवून सदर योजना सुरु करण्यांत आलेली आहे. या योजनेअंतर्गत प्रवाशांना 4 दिवस व 10 दिवसांचे कालावधीकरिता आवडेल तेथे अमर्याद प्रवास करता येतो. या प्रवासाकरिता पासधारक प्रवाशांस ठराविक / ठोक रक्कम महामंडळास अदा करावी लागते आणि याद्वारे प्रवाशांना भरीव प्रवासभाडे सवलत प्राप्त करुन घेता येते.

वरीलप्रमाणे योजनानिहाय ठळक वैशिष्ठये आहेत. तथापि, प्रत्येक योजनेची कार्यपध्दती, नियमावली, अटी व शर्ती, योजनेत सहभागी होण्याची कार्यपध्दती इत्यादी तपशील खालीलप्रमाणे देण्यात येत आहे.

(1)त्रैमासिक पास योजना :  दैनंदिन एकाच मार्गावर नोकरी, व्यवसाय व अन्य कारणांमुळे प्रवास करणारा प्रवासी महामंडळाकडे आकर्षित व्हावा या हेतूने महामंडळाने त्रैमासिक पास योजना सुरु केलेली आहे. त्रैमासिक पास योजनेची ठळक वैशिष्ठये पुढीलप्रमाणे -

i. सदर योजना एकाच मार्गावर सातत्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांकरिता लाभदायक.
ii. या योजनेअंतर्गत पासधारकास 50% प्रवास भाडे सवलत देण्यात येते.
iii. योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी / प्रवाशांनी विहित नमुन्यातील अर्ज तपशिलासहनजिकच्या बसस्थानकांवर सादर करणे आवश्यक पासपोर्ट आकाराचा फोटो लावणे आवश्यक आहे.
iv. पास घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना 2 पासपोर्ट आकाराचे फोटो व रु.5/- देऊन ओळखपत्र प्राप्त करणे आवश्यक आहे.
v. ओळखपत्र प्राप्त झाल्यावर अर्जधारकाने पासाची मागणी केलेल्या मार्गाकरिताच 45 दिवसांचे परतीचे भाडे महामंडळाकडे जमा केल्यास त्यास 3 महिन्याचा कालावधी असलेला  पास देण्यात येईल.
vi. सदर पास शहरी, साध्या व निमआराम सेवांकरिता अनुज्ञेय राहील. निमआराम सेवेच्या पासकरिता निमआराम भाडे दरपत्रकानुसार पासेसचेमूल्य निश्चित करण्यात येते.
vii. सदर योजनेची अधिक माहिती / तपशील महामंडळाच्या सर्व बसस्थानकांवर उपलब्ध आहे.
viii. साधी बस सेवा पासधारकांस निमआराम बस सेवेद्वारे प्रवास अनुज्ञेय आहे. याकरिता पासधारकाने प्रवासमार्गाच्या साधी व निमआराम बस प्रवासभाडयाच्या फरकाची रक्कम वाहकाकडे अदा करुन तेवढया रक्कमेचे प्रवास तिकीट घेणे आवश्यक आहे.

(2)मासिक पास योजना : सदर योजनेअंतर्गत 20 दिवसांचे परतीचे प्रवासभाडे आकारणी करुन एक महिना कालावधीचा परतीच्या प्रवासाचा पास देण्यांत येतो.  या योजनेच्या अटी, शर्ती या त्रैमासिक पास योजनेप्रमाणेच असून या योजनेअंतर्गत प्रवाशांना सुमारे 33.33% प्रवासभाडे सवलतीचा लाभ होतो. सदर योजनेअंतर्गत पास प्राप्त करण्याची कार्यपध्द्तीसुध्दा त्रैमासिक पास योजनेप्रमाणेच आहे.  तथापि, या योजनेअंतर्गत पासधारकास ज्या सेवेचा पास असेल त्या सेवेद्वारेच प्रवास अनुज्ञेय आहे.                                   

(3)वार्षिक सवलत कार्ड योजना : रा.प. सेवेकडे अधिक प्रवासी आकृष्ट व्हावेत म्हणून वार्षिक सवलत कार्ड योजना सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेची ठळक वैशिष्ठे खालील प्रमाणे आहेत.

1) वार्षिक सवलत कार्डाचे मूल्य रू.200/- कोणत्याही आगारात जमा करून प्रवाशास सदर कार्ड घेता येते. त्यावर प्रवाशाचा फोटो व इतर तपशिल असतो.
2) प्रवासात वाहकाला हे कार्ड दाखविल्यावर साध्या व निमआराम (जनता व मिनी, शहरी सेवा वगळून) प्रवास भाडयात प्रवाशाला 10 टक्के सूट देण्यात येते. मात्र प्रवास 18      कि.मी. पेक्षा कमी असू नये. सवलतीनंतर येणारे प्रवासभाडे रुपयाच्या उच्च पटीत आकारण्यांत येते.
3) या कार्डाची वैधता एक वर्ष कालावधीकरिता आहे.
4) कार्ड धारक प्रवाशाचा रा.प. प्रवासात दुर्देवाने अपघाती मृत्यु झाल्यास, रा.प. महामंडळाकडून अपघात प्रकरणांत देत असलेल्या नियमीत नुकसान भरपाईशिवाय अतिरिक्त नुकसान भरपाई रुपये एक लाख मृत प्रवाशाच्या वारसास अथवा नामनिर्देशित केलेल्या व्यक्तीस अदा करण्यांत येते.
5) प्रवास करताना कार्डधारकाने कार्ड स्वत: जवळ ठेवून वाहकास तसेच तपासणी अधिका-यास सदर कार्ड दाखविणे आवश्यक आहे.
6) कार्डधारकास राज्य / आंतरराज्य मार्गांवरील प्रवासासाठी सदर सवलत अनुज्ञेय आहे.
7) कार्डधारकास आरक्षण आकारात सवलत नाही. त्याचप्रमाणे सदर कार्ड अहस्तांतरणीय आहे. प्रवासादरम्यान तपासणीसाठी कार्ड दाखविणे आवश्यक आहे. अन्यथा 10% प्रवासी सवलत फरकाची रक्कम वसूल करण्यांत येते. तसेच विनातिकीट प्रवासासाठी अनुज्ञेय असलेला दंडही आकारण्यांत येतो. कार्डधारक प्रवाशाला मधल्या थांब्यावर बसमध्ये जागा नसल्यास, आसनाची हमी नाही. कार्डधारकास आगाऊ आरक्षणासाठी रांगेत उभे न रहाता प्राधान्याने आरक्षण तिकीट देण्याची मुभा देण्यात आलेली आहे.
8) कार्ड हरविल्यास, नक्कलकार्ड दिले जात नाही वा कार्डाच्या उरलेल्या कालावधीचा परतावा दिला जात नाही. मात्र, खराब झालेल्या कार्डाकरिता 10% सेवा आकार वसूल करुन दुसरे कार्ड दिले जाते.
9) कार्डाचा एक वर्षाचा कालावधी संपल्यानंतर पुन्हा नव्याने कार्ड घ्यावे लागते.
10) वातानुकूलित, डिलक्स, व्होल्वो, मिनी, शहरी, जनता या सेवांना सदर सवलत अनुज्ञेय नाही. तथापि, मुंबई प्रदेशातील बी.एम.टी.सी. मार्गावरील सेवांकरिता (शहरसदृश्य) सवलत अनुज्ञेय आहे.

(4)आवडेल तेथे कोठेही प्रवास योजना : ठराविक कालावधीसाठी सलग प्रवास करणारा प्रवासी महामंडळाच्या सेवेकडे आकृष्ट व्हावा आणि या प्रवाशांना प्रवास भाडे सवलत मिळावी या हेतूने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ''आवडेल तेथे कोठेही प्रवास'' योजना अंमलात आणलेली आहे. या योजनेअंतर्गत 10 दिवस व 4 दिवस कालावधीचा पास देण्यांत येतो.  या अंतर्गत पासेसचे मूल्य प्रवासी हंगामानुसार निर्धारित करण्यांत आलेले असून हंगामाचा कालावधी व पासेसचे मूल्य पुढीलप्रमाणे आहे. :-

1)  गर्दीचा हंगाम  - 15 ऑक्टोबर ते 14 जून.
2)  कमी गर्दीचा हंगाम  - 15 जून ते 14 ऑक्टोबर.

या हंगामानुसार सद्य:स्थितीत अंमलात असलेले पासेसचे दर पुढीलप्रमाणे :-

तक्ता मांक 2

सेवेचा प्रकार

१० दिवसाच्या पासाचे मुल्य

४ दिवसाच्या पासाचे मुल्य

 

गर्दीचा हंगाम

कमी गर्दीचा हंगाम

गर्दीचा हंगाम

कमी गर्दीचा हंगाम

 

प्रौढ

मुले

प्रौढ

मुले

प्रौढ

मुले

प्रौढ

मुले

साधी (जलद, रात्रसेवा, साधी जनता, मिनी, शहरी सेवा)

985

495

835

420

395

200

335

165

निमआराम

1180

590

1000

500

470

235

400

200

आंतरराज्य (साधी व निमआराम)

1270

635

1090

545

510

255

435

220

(वर दर्शविलेल्या मुलांच्या पासाचे दर पाच वर्षांपेक्षा जास्त व 12 वर्षापेक्षा कमी वयोमान असणा-या मुलांसाठी आहेत.)

 या योजनेची ठळक वैशिष्ठये

1) उपरोल्लेखित पासाचे मूल्य 10 व 4 दिवस प्रवासाचे आहे.
2) आंतरराज्य वाहतुकीसाठी महाराष्ट्राच्या एस.टी. सेवा जेथपर्यंत जातात तेथपर्यंत पास निमआराम व साध्या बसेसना वैध राहील. तसेच, सदर पास राज्यातील प्रवासासही वैध राहील.
3) या योजनेतील सर्व प्रकारचे पास रा.प.महामंडळाच्या शहरी वाहतुकीत वैध राहतील.
4) पासधारकास आसन आरक्षित करता येईल. त्याकरिता आरक्षण आकार अदा करणे आवश्यक आहे.
5) पासधारकास आपल्या सोबत विनामुल्य 30 किलो (मुलांसाठी 15 किलो)वजनाचे सामान नेता येईल.
6) पासधारकास पासवर नमूद केल्यानुसार तो पास ज्या सेवेचा असेल त्याच सेवेकरिता किंवा त्यापेक्षा निम्न दर्जाच्या सेवेसाठी वैध राहील.
7) पासावर पासपोर्ट साईजचा फोटो लावणे व तो आगार व्यवस्थापक यांच्याकडून सही व शिक्का मारँन प्रमाणित करँन घेणे आव यक आहे.
8) पासावर पंचींग पध्दत चालू करण्यात आलेली आहे. त्यानुसार प्रवासाच्या तारखेवर पंचींग करण्यात येते.
9) पास जादा बसमध्ये चालणार नाही.
10) पासावर परतावा दिला जात नाही.
11) सदर पास प्रवासाच्या 10 दिवस आधी देण्यांची सुविधा आहे. पासधारकास प्रवासाच्या तारखेपूर्वी नैसर्गिक आपत्ती, नजिकच्या नातेवाईकाचा मृत्यु, इत्यादि कारणांमुळे पास रद्द करावयाचा असल्यास, तसे पासधारकाने पुराव्यासह कळविल्यास, प्रत्येक पासमागे रु.10/- सेवाशुल्क वसूल करुन उर्वरित रक्कमेचा परतावा देण्यांत येतो.
12) नैसर्गिक आपत्ती, नजिकच्या नातेवाईकाचा मृत्यू, अचानक आजारी पडल्यास व तसा दाखला सादर केल्यास या कारणांमुळे पासवरील तारखेस प्रवास करणे शक्य नसेल व पासवरील तारीख बदलून हवी असल्यास जुना पास रद्द करुन नवीन पास देण्यात येतो व त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.

आगाऊ आरक्षण तिकीट धारकास प्रवासाचे दिवशी शहरी बस सेवेद्वारे बसस्थानकापर्यंत प्रवास मोफत सुविधा

आगाऊ आरक्षणाद्वारे प्रवास करणा-या प्रवाशांस प्रवासाच्या दिवशी रहात्या ठिकाणापासून बसस्थानकापर्यंत येण्याकरिता रा.प. महामंडळाची शहरी सेवा असलेल्या ठिकाणी मोफत प्रवासाची सुविधा देण्यांत आलेली आहे. सदर सुविधा आगाऊ आरक्षित केलेल्या प्रवासाच्या दिवशीच व आरक्षित बस सुटण्याच्या वेळेपूर्वी दोन तास अगोदरच्या कालावधीसाठीच लागू राहील.  याकरिता संबंधित प्रवाशांने आगाऊ आरक्षण केलेले तिकीट वाहकांस दाखविणे आवश्यक आहे.

मासिक, त्रैमासिक पास / वार्षिक सवलत कार्ड / आवडेल तेथे प्रवास / प्रासंगिक करार

यांची मागणी करण्याची व प्राप्त करण्याची कार्यपध्द्ती

अ.क्र.

योजनेचा तपशील

मागणीकरिता आवश्यक कागदपत्रे

मागणी कोठे नोंदवावी मागणीची पूर्तता होण्याचा कालावधी मागणी पूर्ण न झाल्यास तक्रार कोठे नोंदवावी अपिलीय अधिकारी

1

त्रैमासिक पास योजना

टिवहीत नमुन्यातील अर्ज, दोन पासपोर्ट आकाराचे फोटो, पासाचे मूल्याची रक्कम नजिकचे बसस्थानक / आगार कार्यालय  मागणी केल्यावर तात्काळ पास देण्यांत येतो. संबंधित आगार व्यवस्थापक टिवभाग नियंत्रक

2

मासिक पास योजना

टिवहीत नमुन्यातील अर्ज, दोन पासपोर्ट आकाराचे फोटो, पासाचे मूल्याची रक्कम नजिकचे बसस्थानक / आगार कार्यालय  मागणी केल्यावर तात्काळ पास देण्यांत येतो. संबंधित आगार व्यवस्थापक टिवभाग नियंत्रक

3

आवडेल तेथे प्रवास

टिवहीत नमुन्यातील अर्ज, दोन पासपोर्ट आकाराचे फोटो, पासाचे मूल्याची रक्कम नजिकचे बसस्थानक / आगार कार्यालय  मागणी केल्यावर तात्काळ पास देण्यांत येतो. संबंधित आगार व्यवस्थापक टिवभाग नियंत्रक

4

वार्षिक सवलत कार्ड

टिवहीत नमुन्या-तील अर्ज, दोन स्टॅम्प आकाराचे फोटो, रु.200/- नजिकचे बसस्थानक / आगार कार्यालय  मागणी केल्यावर तात्काळ पास देण्यांत येतो. संबंधित आगार व्यवस्थापक टिवभाग नियंत्रक

5

प्रासंगिक करार

टिवहीत नमुन्यातील अर्ज व प्रासंगिक कराराची रक्कम नजिकचे आगार कार्यालय  मागणी केलेल्या तारखेस बस उपलब्ध करुन देण्यांत येते. संबंधित आगार व्यवस्थापक टिवभाग नियंत्रक

6

जादा, यात्रा, बाजार, वाहतूकीकरिता बसेसच्या मागणीबाबत मौखिक मागणी बसस्थानक / आगारप्रमुख

उपलब्धतेनुसार वाहन पुरविण्यांत येते.

संबंधित आगार व्यवस्थापक टिवभाग नियंत्रक

लोकाभिमूख कारभारासाठी निर्माण केलेली यंत्रणा / उपाययोजना

सामाजिक बांधिलकी व कार्यक्षम प्रवासी वाहतूक सुविधा निर्माण व्हावी याहेतूने महामंडळाची निर्मिती करण्यात आली असल्याने व महामंडळाच्या दैनंदिन कामकाजात थेट अनेक नागरिकांचा संप येत असल्याने महामंडळाचा कारभार लोकाभिमूख असणे आवश्यक आहे. याकरिता महामंडळाकडून विविध उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. समाजातील विविध सामाजिक घटक, लोक प्रतिनिधी यांचा संयुक्त समावेश असलेल्या सदस्यांची विभागीय सल्लागार समिती शासनाकडून गठीत करण्यात येते. सदर समिती सदस्य समाजाचे प्रतिनिधी या नात्याने रा.प.सेवेसंदर्भात सूचना करत असतात व सूचनांच्या अनुषंगाने कार्यवाही महामंडळाकडून करण्यात येते. महामंडळाने प्रवासी हा केंद्रबिंदू मानून त्यांच्या अडी - अडचणींचा तत्काळ निपटारा व्हावा या हेतूने ''प्रवासी अदालत'' ही संकल्पना अंमलात आणलेली आहे. याअंतर्गत प्रत्येक आगारात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारीद्न, विभागीय कार्यालयात प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी, मध्यवर्ती कार्यालय येथे तिसऱ्या बुधवारी प्रवासी अदालत आयोजित करण्यात येऊन प्रवाशांच्या तक्रारी / सूचना यांची दखल घेण्यात येते.

विशेष प्रवासी अभियान - ''प्रवासी हेच दैवत'', ही जाणीव महामंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांमध्ये सातत्याने जागृत रहावी व कर्मचाऱ्यांमध्ये प्रवाशांबाबत आपुलकीची, सौजन्याची भावना निर्माण व्हावी याकरिता महामंडळाकडून वेळोवेळी विशेष अभियाने राबविण्यात येतात. या अभियानामध्ये प्रवाशांना कार्यक्षम सेवा पुरविणे, प्रवाशांचे हक्क व त्या संदर्भात महामंडळातील कर्मचाऱ्यांची कर्तव्ये इत्यादीबाबत कर्मचारीवर्गाचे विविध मार्गांनी प्रबोधन करण्यात येऊन महामंडळाची सेवा लोकाभिमूख करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. महामंडळाने ''प्रवासी शतक'', प्रवासी जोडो'', ''प्रवासी वाढवा'', ''सौजन्य सप्ताह'' इत्यादी विशेष अभियान राबविलेले आहेत. त्याचप्रमाणे, प्रत्येक विभागात स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र सुरु करुन त्याद्वारे कर्मचाऱ्यांना विशेष ग्राहकाभिमूख वर्तनाचे प्रशिक्षण देण्यात येते.

विधानमंडळ सदस्यांची संयुक्त बैठक - विधानमंडळ सदस्य, संसद सदस्य हे लोकनियुक्त लोकप्रतिनिधी असून ते नागरिकांचे प्रतिनिधीत्व करतात. सार्वजनिक समस्यांसंदर्भात नागरिक आपली गाऱ्हाणी या लोकप्रतिनिधींमार्फत सातत्याने मांडत असतात. याअंतर्गत नागरिकांच्या वाहतूकविषयक गरजा, समस्या, मागणी याबाबतसुध्दा नागरिक विधानमंडळ सदस्य, संसद सदस्य यांच्या माध्यमातून प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करीत असतात. ही बाब विचारात घेऊन महामंडळाने विधानमंडळ सदस्य, संसद सदस्य यांचेसमवेत दर 3 महिन्याने एक संयुक्त बैठक आयोजित करण्याची प्रणाली निर्माण केलेली आहे.  सदर बैठक महामंडळाच्या जिल्हास्तरावरील कार्यालयात आयोजित करण्यात येऊन संबंधित जिल्हयातील लोकप्रतिनिधींना बैठकीसाठी निमंत्रित करण्यात येते. या बैठकीत प्राप्त झालेल्या सूचनांची दखल तत्काळ घेण्यात येते.  याद्वारे महामंडळाचा कारभार लोकाभिमूख करण्याचे प्रयत्न महामंडळाकडून करण्यात आलेले आहेत.

 

 
2007, MSRTC. All rights reserved. Site developed by National Informatics Centre, Navi Mumbai.