प्रकरण-4
विविध सेवाप्रकारनिहाय भाडे दरपत्रक
महामंडळ प्रवासी भाडे दर प्रत्येक सहा
कि.मी.चा एक टप्पा या पध्द्तीने
आकारीत आहे. तर शहरी सेवांकरिता
प्रवासीभाडे
2 कि.मी.चा एक टप्पा
यापध्द्तीने आकारण्यांत येते. 5 ते 12 वर्षापर्यंत वयोमर्यादा असणा-या
प्रवाशांस प्रचलित भाडे दरपत्रकानुसार
अर्धे तिकीट आकारणी करण्यांत येते.
प्रवासी सामानाकरिता स्वतंत्र सामान
वाहतूक भाडे दर आकारण्यांत येतात.
कमी अंतराचा प्रवास करणा-या
प्रवाशांवर अतिरिक्त प्रवासभाडयाचा
बोजा पडू नये याकरिता महामंडळाने 3
कि.मी. पर्यंतच्या प्रवासाकरिता
उपटप्पा पध्दतीने 3 कि.मी. पर्यंतचेच
प्रवास भाडे आकारण्याची सुविधा
निर्माण केलेली आहे. सदर कार्यपध्द्ती
6 कि.मी. पेक्षा जास्त व 27 कि.मी.
पर्यंतच्या प्रवासाकरिता अनुज्ञेय आहे.
उदा. या कार्यपध्द्तीचा फायदा 9 कि.मी.
पर्यंत प्रवास करणा-या प्रवाशाकडून
फक्त 9 कि.मी.चेच म्हणजेच दीड
टप्प्याचेच प्रवासभाडे आकारण्यात येते.
सदर सवलत अनुज्ञेय नसती तर 9 कि.मी.
च्या प्रवासाकरिता 12 कि.मी.चे
म्हणजेच 2 टप्प्याचे भाडे आकारले गेले
असते.
महामंडळाने प्रवासी गर्दीच्या
हंगामानुसार कमी प्रवासभाडे
आकारणी करण्याची कार्यपध्द्ती
नुकतीच अवलंबविलेली आहे.
|
सेवेचा प्रकार |
दिनांक 17.08.2006 पासून 6
कि.मी.च्या प्रति टप्प्याचे
दर.
|
टिकमान प्रवासभाडे (एक
टप्प्याकरिता) दर
|
|
जनता सेवा
|
3.06
|
3.00
|
|
*शहरी
सेवा |
3.00 |
3.00 |
|
साधी/ जलद / रात्रसेवा |
3.78 |
4.00 |
|
निम आराम |
4.49 |
5.00 |
|
आराम / डिलक्स |
5.83 |
6.00 |
|
वातानुकूलीत- शिवनेरी |
7.35 |
8.00 |
|
वातानुकूलीत-महाबस |
6.56 |
7.00 |
*
शहरी सेवेकरिता दोन कि.मी.चा एक टप्पा
या दराने प्रौढ प्रवाशास रु.3/- व
मुलास रु.2/- किमान भाडे आकारणी
करण्यांत येते. प्रवास भाडे रुपयाच्या
पटीत पुर्णांकात आकारण्यात येते. भाडे
आकारणी पुर्णांकात करताना 50
पैशांपेक्षा कमी भाडे सोडून देण्यात
येते. 50 व त्यापेक्षा जास्त भाडे
पुढील रुपयाच्या पटीत आकारण्यात येते.