msrtc home msrtc about us msrtc services msrtc rti msrtc news msrtc contact
 

Citizen's Charter: Chapter-17

प्रकरण-17

अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांद्वारे प्रवास न करणेबाबत

  • संपूर्ण राज्यात टप्पा व कंत्राटी प्रवासी वाहतुकीचे एकाधिकार काही अपवाद वगळता फक्त म.रा.मा प.महामंडळासच आहेत.

  • पर्यटन परवाना धारण करणाऱ्या खाजगी वाहनांतून फक्त ऐतिहासिक, धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठी पर्यटक गटाने कंत्राटी पध्दतीवर प्रवास करु शकतात.

  • या वाहनांना परवाना नसतानाही टप्पा पध्दतीने प्रवासी वाहतूक करण्यात येते. अशी वाहतूक बेकायदेशीर असून या वाहनांद्वारे प्रवाशांनी प्रवास करु नये.

  • काळया - पिवळया रिक्षा, टॅक्सी मधून 3 ते 6 प्रवाशांच्या गटाने वाहतूक ठराविक क्षेत्रामध्ये करण्याची परवानगी असते. मात्र, अशा वाहनांकडून परवान्यातील अटी व शर्तींचे उल्लंघन करुन आणि निर्धारित केलेल्या क्षेत्राबाहेर जाऊन प्रवाशांची बेकायदेशीर वाहतूक करण्यात येते.

  • जीप्स, टेम्पो, ट्रॅक्स, टाटा सुमो इत्यादी खासगी वाहने वैयक्तिक उपयोगासाठीच वापरता येतात. अशा वाहनांतून प्रवास भाडे देऊन प्रवास करणे बेकायदेशीर आहे.

  • ट्रक, टेम्पो, ट्रॅक्टर इत्यादी वाहनांना फक्त मालवाहतुकीची परवानगी असते. अशा वाहनांतून प्रवास करणे बेकायदेशीर आहे.

  • उपरोक्त अवैधरीत्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांतून प्रवास करणे बेकायदेशीर आहे. अशा वाहनांतून प्रवास करताना प्रवासी आढळल्यास त्याचा खोळंबा होऊन गैरसोय होऊ शकते. तेव्हा प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी फक्त रा.प.बसनेच प्रवास करावा.

 
2007, MSRTC. All rights reserved. Site developed by National Informatics Centre, Navi Mumbai.