msrtc home msrtc about us msrtc services msrtc rti msrtc news msrtc contact
 

Citizen's Charter: Chapter-1

प्रकरण-1


नवीन बस सेवा सुरु करण्याची कार्यपध्दती

नागरिकांसाठी कार्यक्षम, पुरेशी रस्ते प्रवासी वाहतूक सेवा निर्माण करण्याच्या मुख्य उद्देश केंद्रीभूत ठेऊनच महामंडळ कामकाजाची दिशा निश्चित करीत असते. परिणामी, रस्ते प्रवासी वाहतुकीसंदर्भात समाजातील विविध घटकांची मागणी, त्यांचेकडून वेळोवेळी प्राप्त होणारी निवेदने त्याचप्रमाणे महामंडळाकडे उपलब्ध असलेली माहिती इत्यादीचे शास्त्रीय पध्दतीने संकलन करण्यात येऊन राज्यातील विविध मार्गांवर नवीन बस सेवा सुरु करणे किंवा कार्यरत असलेल्या सेवा स्थगित करणे, या संदर्भात निर्णय घेण्यात येतात. सर्वसाधारणपणे नवीन बस सेवा सुरु करण्याबाबत महामंडळाकडे मागणी आल्यास मागणी करण्यात आलेल्या मार्गांवर उपलब्ध असलेल्या बस सेवा, त्यांना मिळणारा प्रवासी प्रतिसाद, त्या मार्गांवर उपलब्ध असलेली प्रवासी क्षमता, व्यापारी / औद्योगिक केंद्रे, शैक्षणिक संस्था इत्यादी घटक विचारात घेऊन नवीन बस सुरु करण्याची आवश्यकता पडताळली जाते आणि तद्नंतर नवीन बस सुरु करण्याच्या मागणीबाबत अंतिम निर्णय घेण्यात येतो.

प्रवासी वाहतुकीसाठी नवीन रस्ता निर्माण झाल्यास तो मार्ग ज्या रस्ते प्राधिकरणाच्या कार्यकक्षेत येतो, अशा प्राधिकरणातील सक्षम अधिकाऱ्याचा ''रस्ता रा.प. प्रवासी वाहतूकीस योग्य असल्याबाबतचा दाखला'' आवश्यक असतो. सदर प्रकरणी संबंधित मार्गांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात येऊन सर्व बाबी नवीन बस सुरु करण्यांस अनुकूल असल्याचे आढळून आल्यास, अशा मार्गावर नवीन बस सेवा सुरु करण्याची कार्यपध्दती अवलंबविण्यात येते.

नवीन बस सेवा सुरु करणेकरीता नागरिकांनी त्या संदर्भातील मागणी संबंधित विभाग नियंत्रक यांचेकडे करणे आवश्यक आहे. सदर मागणीबाबतची छाननी करुन त्याबाबत संबंधित विभाग नियंत्रक हे महामंडळाच्या कार्यपध्द्तीनुसार कार्यवाही करतात, आगाऊरित्या करण्यांत येऊन त्याची अंमलबजावणी सर्वसाधारणपणे दरवर्षी माहे जुलै दरम्यान करण्यांत येते. ही बाब विचारात घेता, नवीन बसेसच्या मागणीबाबतची मागणी नागरिकांनी माहे डिसेंबरपूर्वी करणे आवश्यक आहे. तथापि, नागरिकांची गैरसोय होऊ नये याकरिता दरम्यानच्या कालावधीत प्राप्त झालेल्या निवेदनांची दखल महामंडळाकडून तात्काळ घेण्यांत येते.
 
रा.प. बससेवा सुरु करणे अथवा त्यांचे वेळेत / मार्गात / सेवाप्रकारात बदल करणे या संदर्भातील सूचना / मागणी नागरिकांनी संबंधित आगार व्यवस्थापक / विभाग नियंत्रक यांचेकडे केल्यास त्याबाबतची तपासणीअंती कार्यवाही कालमर्यादेत महामंडळाकडून करण्यात येते आणि करण्यात आलेली कार्यवाही संबंधितांस, मागणीकर्त्यास कळविण्यात येते. अशाप्रकारे महामंडळाचा कारभार प्रवासीभिमुख होईल या दृष्टीने महामंडळाकडून दक्षता घेण्यात येते.

 
2007, MSRTC. All rights reserved. Site developed by National Informatics Centre, Navi Mumbai.