Welcome to the official website of MSRTC
   
  M.S.R.T.C. Buses
   
 
Traffic
Mechanical
Personnel
Security & Vigilance
Accounts
Stores & Purchase
Planning
Civil
Public Relations Officer
Legal
Statistics
Secreterial Branch
   
 
 
ज्येष्ठ नागरिकांना प्रवास भाड्यात सवलत
 

महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार दिनांक १ जानेवारी १९९६ पासून रा.प. महामंडळाच्या सध्या / जलद व रातराणी सेवांच्या प्रवासी भाड्यात ज्येष्ठ नागरीकांना (६५ वर्षावरील) ५० % सवलत देण्यात येत होती, ती शासन निर्णय क्र. एसटीसी / ३४०१ प्रक्र- ११२ / परि -१ दिनांक ६/९/२००१ अन्वये दिनांक २०/९/२००१ पासून ३३.३३ % सवलत देण्यात येत होती. परंतू दिनांक २७/७/२००४ पासून ज्येष्ठ नागरिकांना, शासन निर्णय एसटीसी ३४०४ /सी आर ८४ / परी दिनांक २७/७/२००४ पासून ५० % सवलत देण्यात येत आहे.

दररोज प्रवास करणा-या प्रवाशांना मासिक सवलतीचे पास
अ)
पूर्वी दररोज प्रवास करणा-या प्रवाशांमध्ये नोकरदार वर्ग व व्यापारी वर्ग असे वर्गीकरण करून त्यांना सुट्‌टीचे दिवस वगळून प्रवास करण्यासाठी सवलतीचा पास देण्यात येत असे. तथापि महामंडळाने ठराव क्र. ९८.०५.२१ दिनांक २१/०५/१९९८ नुसार सदर योजनेमध्ये सुधारणा केली असून २० दिवसांच्या दुहेंरी प्रवासाचे भाडे आकारुन मासिक पास देण्यात येतो.

ब) दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्रैमासिक सवलतीचे पास
महामंडळ ठराव क्र. २००४:०६:०५ दिनांक १६/६/२००४ नुसार दररोज प्रवास करणा-या प्रवाशांना ४५ दिवसाचे दूहेरी प्रवास भाडे भरून तीन महिने प्रवास करण्याची सवलत दिनांक ५/७/२००५ पासून देण्यात आली आहे.

जनता फेया
सध्या कमी होत असलेल उत्पन्न वाढविण्यासाठी व खासगी वाहतुकीकडे वळणार स्थानिक प्रवासी रा.प. गाडयाकडे आकर्षित करण्यासाठी तसे अवैध प्रवशी वाहतूकीला शह देण्यासाठी जनता फेयास एकूण वाहतूकीच्या १५ % पर्यंत वाढ करण्यात येत आहे सध्या ८३५ % इतकी टक्केवारी आहे.

रात्रीच्या जादा गाडया
प्रवाशांच्या रात्रीच्या गाड्यातून प्रवास करण्याचा कल विचारात घेऊन रात्रीच्या जादा गाड्या सोडण्यात येतात. यापूर्वी रात्रीच्या जादा गाड्या सोडण्यात येत नसत. प्रासंगिक करारावर सुद्धा रात्रीच्या जादा गाड्या देण्यता येतात.

विविध सवलती
रा.प. महामंडळाकडून २१ विविध सामाजिक घटकांना प्रवासी भाड्यात सवलती दिल्या आहेत. सदर सवलती पोटी सन २००५-०६ या वित्तीय वर्षात शासनाकडून येणे असलेल्या रुपये ३७२.९९ कोटी इतक्या रक्कमेचे शासनाला देय होणा-या प्रवासी करातून समायोजन करण्यात आले आहे.

 
2010, MSRTC. All rights reserved. Site developed by National Informatics Centre, Navi Mumbai.