Welcome to the official website of MSRTC
   
  M.S.R.T.C. Buses
   
 
Traffic
Mechanical
Personnel
Security & Vigilance
Accounts
Stores & Purchase
Planning
Civil
Public Relations Officer
Legal
Statistics
Secreterial Branch
   
 
 
निरनिराळया प्रकारच्या वाहतूक सेवा
 
अ) प्रवास सुखसोयी व सुविधा
प्रवाशांना जास्तीत जास्त प्रवास सुखकर करण्याचे एकमेव ध्येय असून त्यासाठी खालील प्रवासी सुविधा पुरविण्यात आल्या आहेत.
१) आगार-                            २४८
२) बसस्थानके-                       ५७३
३) मार्गस्थ निवारे-                   ४२७७
४) उपहारगृहे व चहाची दुकाने-        ११८२
५) पुस्तकांची दुकाने-                 २६३
६) इतर वाणिज्य अस्थापन-           १५५१

ब) सुलभ व्यवस्था
‘‘सुलभ इंटरनॅशनल’’ या संस्थेद्वारे रा.प. बसस्थानकावरील स्वच्छता गृहांची देखभाल केली जाते. अशा प्रकारची सुलभ स्वच्छता गृहांची व्यवस्था महाराष्ट्रात ३०० ठिकाणी करण्याचे महामंडळाचे उद्‌दीष्ठ आहे. महामंडळात १०६ निरनिराळ्या ठिकाणी सुलभ स्वच्छता गृहाची सोय करण्यात आली आहे.

क) थंड पाण्याची सोय
प्रवाशांना स्वच्छ व थंड पाणी उपलब्ध व्हावे म्हणून राज्यातील एकूण ८८ रा.प. बस स्थानकावर आतापर्यंत वॉटर कुलर्स बसविण्यात आलेले आहेत व त्यात आणखी वाढ करण्याच्या दृष्टीने कार्यवाही चालू आहे.

ड) फलाट तिकिट योजना
दिनांक १/१/१९९६ पासून मुंबई सेंट्रल येथील बसस्थानकावर फलाट प्रवेश तिकिट योजना चालू करण्यात आली आहे. ज्यांना बसस्थानकात जावयाचे आहे अशा व्यक्तिंना एक रुपयाचे फलाट तिकिट घ्यावे लागेल, परंतु ज्यांचेकडे आरक्षण तिकिट आहे अशा प्रवाशांना व १२ वर्षापर्यंतच्या मुलांना हे तिकीट घ्यावे लागत नाही.

 
2010, MSRTC. All rights reserved. Site developed by National Informatics Centre, Navi Mumbai.