Welcome to the official website of MSRTC
   
  M.S.R.T.C. Buses
   
 
Traffic
Mechanical
Personnel
Security & Vigilance
Accounts
Stores & Purchase
Planning
Civil
Public Relations Officer
Legal
Statistics
Secreterial Branch
   
 
 
आवडेल तेथे कोठेही प्रवास
 
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आवडेल तेथे कोठेही प्रवास योजना १९८८ पासून प्रवाशांसाठी राबवित आहे. या योजने अंतर्गत ७ दिवसांचा पास दिला जातो. दिनांक २३/४/२००६ पासून ७ दिवसाच्या पासा प्रमाणे ४ दिवसांचा पास दिला. जात आहे प्रवाशांच्या गरजे प्रमाणे या योजनेत वेळोवेळी बदल करण्यात आलेले आहेत. पूर्वी एकाच प्रकारच्या सेवेच्या पासाचे मुल्य पुढील वाढ होईपर्यंत एकच ठेवण्यात येत असे. परंतु दिनांक २२/९/२००३ पासून पासच्या मुल्यासाठी पुढील प्रमाणे दोन हंगाम ठेवण्यात आलेले आहेत.
१) गर्दीचा हंगाम            १५ ऑक्टॊबर ते १४ जून.
२) कमी गर्दीचा हंगाम    १५ जून ते १४ ऑक्टॊबर.
या हंगामानुसार ठरविलेले पासचे दर दिनांक २३/४/२००६ पासून पुढीलप्रमाणे आहेत.

                                                           तक्ता क्रमांक २.

 

सेवेचा प्रकार ७ दिवसाच्या पासाचे मुल्य ४ दिवसाच्या पासाचे मुल्य
  गर्दीचा हंगाम कमी गर्दीचा हंगाम गर्दीचा हंगाम कमी गर्दीचा हंगाम
प्रौढ मुले प्रौढ मुले प्रौढ मुले प्रौढ मुले
साधी (जलद, रात्रसेवा, साधी जनता, मिनी, शहरी सेवा) १२०० ६०० ११०५ ५५५ ६८५ ३४५ ६३५ ३२०
निमआराम १३७० ६८५ १२६५ ६३५ ७८५ ३९५ ७२५ ३६५
आंतरराज्य (साधी व निमआराम) १४७५ ७४० १३७० ६८५ ८४५ ४२५ ७८५ ३९५

या योजनेची ठळक वैशिष्ठे
१) उपरोल्लेखित पासाचे मूल्य ७ व ४ दिवस प्रवासाचे आहे.
२) आंतरराज्य वाहतूकीसाठी महाराष्ट्राच्या एस.टी. सेवा जेथपर्यंत जातात तेथे पास वैध राहील.
३) या योजनेतील सर्व प्रकारचे पास रा. प. महामंडळाच्या शहरी वाहतुकीत वैध राहतील.
४) पासधारकास आसन आरक्षित करता येईल.
५) पासधारकास आपल्या सोबत विनामुल्य ३० किलो (मुलांसाठी १५ किलो) वजनाचे सामान नेता येईल.
६) उच्च दर्जाच्या गाडीचा पास निम्न दर्जाच्या गाडीस वैध राहील.
७) पासावर पासपोर्ट साईजचा फोटो लावणे व तो आगार व्यवस्थापक यांच्याकडून सही व शिक्का मारून प्रमाणित करून घेणे आवश्यक आहे.
८) पासावर पंचींग पद्धत चालू करण्यात आलेली आहे. त्यानुसार प्रवासाच्या तारखेवर पंचींग करण्यात येते.
९) पास जादा बसमध्ये चालणार नाही.
१०) पासावर परतावा देण्याची पद्धत बंद करण्यात आलेली आहे.

 
2010, MSRTC. All rights reserved. Site developed by National Informatics Centre, Navi Mumbai.