Welcome to the official website of MSRTC
   
  M.S.R.T.C. Buses
   
 
Traffic
Mechanical
Personnel
Security & Vigilance
Accounts
Stores & Purchase
Planning
Civil
Public Relations Officer
Legal
Statistics
Secreterial Branch
   
 
 
सुरक्षितता मोहीम
 
राष्ट्रीय रस्ते सुरक्षितता परिषद, भारत सरकार या परिषदेने घेतलेल्या निर्णयानुसार मोटर वाहन अपघात सुरक्षिततेची जाणिव सर्व स्तरावर होण्यासाठी संपूर्ण देशभर दरवर्षी जानेवारी महिन्यात सुरक्षितता मोहीम राबविण्यात येते. या विषयाबाबत केंद्र व राज्य शासनाने दिलेल्या आदेशांनुसार संपूर्ण महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात दि. १ जानेवारी ते १० जानेवारी २००६ या कालावधीत मार्ग सुरक्षितता मोहीम साजरी करण्यात आली. आता पर्यंत महामंडळात २३ वेळा सुरक्षितता मोहीमा आयोजित करण्यात आल्या आहेत. यावर्षीच्या मोहीमेत खालील दर्शविलेले निरनिराळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

मोहीमेचा उद्देश
प्रवाशांमध्ये सुरक्षित प्रवासाबद्दल विश्वास वृद्धींगत करणे, सर्व राज्य परिवहन कर्मचा-यांच्या मनामध्ये सुरक्षित वाहतूकीच्या जबाबदारीची जाणीव निर्माण करणे, सुरक्षित वाहतूकीसाठी घालून दिलेल्या कार्यपद्धती पाळण्यावर भर देणे तसेच राज्य परिवहन वाहनांना अपघात होणार नाहीत या सदैव काळजी घेणे.

मोहीमेत सहभागी होणारे मान्यवर /अधिकारी/ कर्मचारी
१) मा. अध्यक्ष म.रा.मा.प. महामंडळ
२) मा. उपाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक, म.रा.मा.प. महामंडळ
३) सर्व मा. संचालक, म.रा.मा.प. महामंडळ
४) मा. सह व्यवस्थापकीय संचालक, म.रा.मा.प. महामंडळ
५) सर्व खाते / शाखा प्रमुख
६) सर्व स्तरावरील अधिकारी (मध्यवर्ती, प्रदेश, विभाग व आगार कार्यालय)
७) सर्व स्तरावरील पर्यवेक्षक
८) सर्व चालक / वाहक
९) सर्व यांत्रिकी व देखभाल कर्मचारी

प्रचार कालावधी व प्रचाराची दिशा
दिनांक २५/१२/२००५ ते ३१/१२/२००५ या कालावधीत सर्व विभागांमध्ये सुरक्षितता मोहीमेचा प्रचार करण्यात आला. प्रचार कालावधी व सुरक्षितता मोहीम या कालावधीत वाहनांमधील दोष व वाहन चालविण्यामधील दोष या मुद्दयावर विशेष लक्ष पुरविण्यात आले.

सुरक्षितता मोहीम कालावधी
दिनांक १/१/२००६ ते १०/१/२००६ या कालावधीत सुरक्षितता मोहीम साजरी करण्यात आली. सुरक्षितता मोहीमेचे दिनांक १/१/२००६ रोजी मान्यवर जसे पोलीस आयुक्त, जिल्हा दंडाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, पोलीस अधिक्षक, उप जिल्हाधिकारी, तहसिलदार, प्रादेशीक परिवहन अधिकारी, वैद्यकिय अधिकारी, नामांकित शाळाकॉलेजचे प्राध्यापक/अध्यापक, स्थानिक समाज कार्यकर्ते, रोटरी, लायन्स, जेसीस या सारख्या सामाजीक कार्य करणा-या संस्थाचे पदाधिकारी/सभासद व यासारखे इतर मान्यवर यांचे हस्ते प्रत्येक आगारात उद्‌घाटन करण्यात आले.

मार्ग देखरेख
राज्यातील राष्ट्रीय / राज्य महामार्ग व तसेच इतर रस्त्यावर मार्ग देखरेख कार्यक्रम राबविण्यात आला. या देखरेख कार्यक्रमात अधिकारी व पर्यवेक्षकीय कर्मचारी यांचा समावेश होता या कार्यक्रमामध्ये चालकांच्या वाहना चालविण्याच्या सवयींवर विशेष लक्ष देण्यात आले. तसेच अतिवेगाने वाहन चालविणे, चुकीच्या पद्धतीने पुढील वाहनास ओलांडून जोणे, अरूंद पुलावरून समोरून वाहन येत असेल तर राज्य परिवहन पुलावर नेणे, अनधिकृत थांब्यावर या प्रवृत्ती पासून चालकांना परावृत्तकरण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. राज्यातील निरनिराळ्या मार्गावर तात्पुरती तपासणी केंद्रे उभारण्यात आली होती.

कर्मचा-यांच्या बैठका
प्रचार मोहीम कालावधीत तसेच सुरक्षितता मोहीम कालावधीत कर्मचा-यांच्या बैठका आयोजित करण्यात आल्या. या बैठकांमध्ये सर्व कर्मचा-यांच्या मनावर सुरक्षितपणे प्रवाशांची वाहतूक व बचावात्मक पद्धतीने वाहन चालविण्याचे महत्व बिंबविण्यात आले. वेग मर्यादा न पाळल्यामुळे, वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे योग्य पद्धतीमुळे वाहन न चालविल्यामुळे होणा-या नुकसानीबाबत कर्मचा-यांना माहिती देऊन सतर्क करण्यात आले. अपघाताकडे कल असलेल्या चालकांवर विशेष लक्ष देण्यात आले. सुरक्षितता मोहीम कालावधीत अपघात व सुरक्षितता उपाययोजनेची आवश्यकता या विषयावर राज्य परिवहन कर्मचा-यांसाठी भाषण/प्रबोधन करण्यासाठी समाजातील निरनिराळया स्तरावरील मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले होते. अशा प्रकारची पाच भाषणे प्रत्येक आगारात सुरक्षितता मोहीम कालावधीत आयोजित करण्यात आली.

सुरक्षीतता मोहीमेची प्रसिद्धी

सुरक्षीतता मोहीमेची प्रसिद्धी होण्यासाठी प्रत्येक आगारात सुरक्षितता मोहीमेची १० फुट बाय २ फुट आकाराचे बॅनर्स दर्शनी भागी प्रदर्शीत करण्यात आले. सुरक्षितता मोहीमेचे बिल्ले सर्व कर्मचा-यांना वाटण्यात आले. सुरक्षितता मोहीमेची प्रसिद्धी वर्तमान पत्रातूनही देण्यात आली. सुरक्षितता मोहीमेची भिंतीपत्रके चालक/वाहक यांच्या विश्रांतीगृहात, नियंत्रीत कक्षात, बसस्थानकांवर, विभागीय व आगार कार्यशाळेत आणि इतर महत्वाच्या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आलीत. मा. अध्यक्ष, मा. उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांचे चालकांसाठी आवाहन पत्रक तयार करण्यात आले होते. या आवाहन पत्रकाची प्रत प्रत्येक चालकास देण्यात आली.

इतर कार्यक्रम
महामंडळाच्या काही आगारमध्ये सुरक्षितपणे वाहन चालविण्याच्या विषयीचे बोधपट चालकांना दाखविण्यात आले. कार्यशाळेमधून बाहेर पडणारी वाहने पुर्णत: मार्गावर धावण्याच्या निर्दोष स्थितीत असल्याबाबत यंत्र अभियांत्रिकी कर्मचा-यांनी खात्री केली. राज्य परीवहन चालकाने वाहनात असलेले दोष निदर्शनास आणले असता, या दोषांचे पुर्णपणे निराकरण करण्यात आल्यानंतरच वाहन मार्गावर पाठविण्यात आले. सुरक्षितता मोहीम कालावधीत ज्या चालकांना प्रशिक्षणासाठी बोलविण्यात आले, त्या चालकांना अपघाताचे दुष्परिणाम समजावून सांगण्यात येऊन कोणत्याही चुकीमुळे अपघात होतात, त्या चुका निदर्शनास आणून देण्यात आल्या काही सेवाभावी संस्थांनी चालकांसाठी दृष्टीतिक्ष्णता तपासणी शिबीरे आयोजित केले होती. या शिबिरांमध्ये राज्य परिवहन चालक / कर्मचा-यांना पाठवून दृष्टीतिक्ष्णता तपासणी करून घेण्यात आली. चालक, वाहक व इतर कर्मचारी यांच्यामध्ये अपघात सुरक्षितता जबाबदारीचे वातावरण निर्माण करण्यासाठी सुरक्षितता मोहिमेचा विशेष आराखडा तयार करून त्यानुसार कार्यक्रम सर्वस्तारावर राबविण्यात आले.

सन १९९५ रास्ता सुरक्षा वर्ष
भारत सरकारच्या आदेशान्वये सन १९९५ वर्ष हे ’रस्ता सुरक्षा’ वर्षे म्हणून साजरे करण्यात आले होते. यासाठी चालकांची उजाळणी प्रशिक्षण, चालकांची दृष्टी तिक्ष्णतेची तपासणी, मार्ग देखरेख, मान्यवरांची भाषणे, भिंतीपत्रके प्रदर्शित करणे इत्यादी कार्यक्रम सर्व विभागामध्ये आयोजित करण्यात आले होते.
 
2010, MSRTC. All rights reserved. Site developed by National Informatics Centre, Navi Mumbai.