Welcome to the official website of MSRTC
   
  M.S.R.T.C. Buses
   
 
Traffic
Mechanical
Personnel
Security & Vigilance
Accounts
Stores & Purchase
Planning
Civil
Public Relations Officer
Legal
Statistics
Secreterial Branch
   
 
 
चालकांचे प्रशिक्षण
 
अ) अभिक्रम प्रशिक्षण -- कालावधी ८ आठवडे
चालकाच्या जागेसाठी निवड ही कसोशीने होण्यासाठी उमेदवारांची प्रादेशिक छाननी समितीच्या कार्यवाही आधी विभागीय वाहतूक अधिकारी, विभागीय कर्मचारीवर्ग अधिकारी व वाहतूक निरीक्षण (प्रशिक्षण) यांनी अर्जाची छाननी करावयाची असते व तसेच उमेदवारंची वाहन चालविण्याच्या क्षमतेबाबत प्राथमिक चाचणी घ्यावयाची असते. या चाचणीत उत्तीर्ण होण-या उमेदवारांची नंतर प्रादेशिक छाननी समितीने मुलाखत / चाचणी घ्यावयाची असते. या समितीने निवड केलेल्या चालकांची शारीरिकदृष्ट्या वैद्यकीय तपासणी करण्यात येते. त्यानंतर त्यांन ८ आठवड्याच्या अभिक्रम प्रशिक्षण कार्यक्रमासाठी पाठविण्यात येते. अभिक्रम प्रशिक्षण कार्यक्रम पुर्ण झाल्यानंतर प्रशिक्षीत उमेदवारांची यंत्र अभियंता (चालन), विभागीय वाहतूक अधिकारी व वाहतूक निरीक्षक (प्रशिक्षण) ही समिती वाहन चालविण्याची अंतिम चाचणी घेते. अंतिम चाचणीत जे उमेदवार उत्तीर्ण होतात त्यांना रोजंदार चालक म्हणून नियुक्त करण्यात येते.

ब) उजळणी प्रशिक्षण -- कालावधी १ आठवडा
चालकांना उजळणी प्रशिक्षणासाठी बोलविण्याबाबत खालील सुचना कार्यान्वित आहेत.
१) ज्या चालकांची १० वर्षे किंवा कमी सेवा महामंडळात झाली आहे अशा चालकांना दर २ वर्षातून एकदा उजळणी प्रशिक्षण देणे.
२) ज्या चालकांची १० वर्षापेक्षा ज्यास्त सेवा महामंडळात झाली आहे अशा चालकांना दर ५ वर्षातून एकदा उजळणी प्रशिक्षण देणे.
हा प्रशिक्षण कार्यक्रम प्रत्यक्ष वाहन चालविण्याच्या सुधारणेवर आधारित असतो. ज्यामध्ये चालकाचे दोष शोधून अथवा चालकाने वाहन चालवित असतांना कोणतीही वाईट सवय आत्मसात केली असल्यास ती त्या चालकाच्या नजरेस आणून देऊन सुधारात्मक प्रशिक्षण देण्यात येते.

क) अपघात प्रवण पाठ्यक्रम प्रशिक्षण -- कालावधी १० दिवस 
कोणत्याही प्राणांतिक अपघात करणा-या चालकाला कामावरुन त्वरीत उतरविण्यात येते आणि त्याला १० दिवसांच्या अपघात प्रवण पाठ्यक्रम प्रशिक्षणासाठी पाठविण्यात येते. चालकाकडून ज्या दोषामुळे अपघात झाला तो दोष सुधारण्यासाठी वाहन चालविण्याचे प्रात्यक्षिक दाखवून सुधारणात्मक प्रशिक्षण देण्यात येते.

अभिक्रम पाठ्यक्रम, उजळणी पाठ्यक्रम व अपघात प्रवण पाठ्यक्रम यांचे संरचनात्मक पाठ सर्व विभागीय प्रशिक्षण शाळांना पुरविण्यात आले आहेत. चालक प्रशिक्षण कालावधीत प्रत्यक्ष वाहन चालविण्याचे प्रशिक्षण योग्य प्रकारे होण्यासाठी प्रशिक्षण वाहनात एका वेळेत १५ पेक्षा जास्त प्रशिक्षणार्थी पाठविण्यात येऊ नयेत अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच वाहतूकीच्या निरनिराळ्या कोंडीमध्ये प्रत्यक्ष वाहन चालविण्याचे देण्याबाबत नियम घालून देण्यात आले आहेत.
 
2010, MSRTC. All rights reserved. Site developed by National Informatics Centre, Navi Mumbai.