|
|
| |
| बिनतारी संदेश वहन यंत्रणा प्रायोगिक प्रकल्प सन १९९२ मध्ये खालील निवडक ठिकाणी उभारण्यात आला होता. |
| |
रा.प. प्रवासी सेवेकडे अधिक प्रवासी आकृष्ठ व्हावेत म्हणून वार्षिक सवलत कार्ड योजना(Annual Concession Card) दिनांक ६ सप्टेंबर पासून चालू करण्यात आलेली आहे.
या योजनेची ठळक वैशिष्ठे खालील प्रमाणे आहेत.
१) वार्षिक सवलत कार्डाची किंमत रुपये २००/- कोणत्याही आगारात जमा करून प्रवाशस ते घेता येते. त्यावर प्रवाशाचा फोटो व इतर तपशील असतो.
२) प्रवासात वाहकाला हे कार्ड दाखविल्यावर साध्या व निमआराम (जनता व मिनी, शहरी सेवा वगळून) प्रवास भाड्यात प्रवाशाला १० % सूट देण्यात येते. मात्र १८ कि.मी. पेक्षा कमी असू नये.
३) हे कार्ड घेतल्यापासून एक वर्ष वैध राहील.
४) एप्रिल २००५ ते मार्च २००६ पर्यंत ४२,५०० कार्डसची विक्री झाली आहे.
|
| |
|