Welcome to the official website of MSRTC
   
  M.S.R.T.C. Buses
   
 
Traffic
Mechanical
Personnel
Security & Vigilance
Accounts
Stores & Purchase
Planning
Civil
Public Relations Officer
Legal
Statistics
Secreterial Branch
   
 
 
वाहतूक : वातानुकूलित बस सेवा
 
वातानुकूलित बस सेवा

दादर-पुणे-दादर मार्गावर महामंडळाची वाहतूक सेवा १९८१ पासून चालू आहे. जसजशी ही वाहतूक लोकप्रिय होत गेली तसतसे या मार्गावर फेऱ्या वाढविण्यात आल्या दिनांक १६/७/१९९४ पासून डिलक्स बस सेवा व में १९९६ पासून वातानुकूलित बस सेवा चालू करण्यात आलेली आहे. डिलक्स बस सेवेसाठी रुपये १५५/- प्रमाणे भाडे आकारणी करण्यात येत आहे.

दिनांक २८/१२/२००२ पासून या मार्गावर ५ वातानुकूलित व्होल्वो बसेसची वाहतूक चालू करण्यात आलेली असून प्रत्येक बसच्या प्रत्येकी दोन परतीच्या फे-या चालू करण्यात आल्या आहेत. या बसचे कमी हंगामातील कालावधी तिकीट (प्रवास भाडे) रुपये २००/- (दिनांक १/१२/२००५ पासून) ठेवण्यात आले होते. सदरचे बस भाडे गर्दीच्या हंगामात ( १ एप्रिल २००६ ते ३० जून या कालावधीसाठी) रुपये २३५/- करण्यात आले होते. शासनाने हंगामानुसार भाडे दर ठरविण्यास दिलेल्या परवानगीनुसार हे भाडे दर ठरविण्यात आले आहेत. बसची आसन क्षमता ४५ आहे. या गाडीच्या वाहतूकीस प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने सदर मार्गावर आणखी १० नवीन वातानुकूलित बसेस चालनात आणण्यात आल्या आहेत, तसेच ठाणे-पुणे मार्गावर ३ व्होल्वो बसेस व बोरिवली-पुणे मार्गावर २ व्होल्वो बसेस प्रवाश्यांची निकड पाहून चालनात आणण्यात आल्या होत्या. परंतु बोरीवली-पुणे मार्गावर अपेक्षित भारमान मिळत नसल्याने त्या दादर-पुणे या मार्गावर चालविण्यात येत आहेत. या सेवेचे नामकरण ‘‘शिवनेरी’’ असे करण्यात आले आहे. त्याच प्रमाणे अजिंठा टी पाँइट ते अजिंठा लेणी या मार्गावर ५ वातानुकूल विरहीत व ५ वातानुकूलीत बसेस चालनात आहेत. त्यांचे प्रवासी तिकीट भाडे अनुक्रमे ६/- व १०/- घेण्यात येते.

सध्या खालील प्रमाणे बसेस चालनात आहेत. (३१/५/२००६ ची स्थिती)

१) एकूण डिलक्स बसेस ५० (मुंबई २९ + पुणे १६ औरंगाबाद ५)

२) एकूण वातानुकूलित बसेस ३२ (मुंबई १७ + पुणे १० औरंगाबाद ५)

वरील प्रमाणे पुणे - दादर, पुणे - ठाणे या मार्गावर एकूण ७२ बस गाड्या चालनात आहेत. गर्दीच्या हंगामात वरील फे-या मध्ये प्रवासी गरजेप्रमाणे वाढ करण्यात येते.
 
2010, MSRTC. All rights reserved. Site developed by National Informatics Centre, Navi Mumbai.