M.S.R.T.C. Buses
   
 
Traffic
Mechanical
Personnel
Security & Vigilance
Accounts
Stores & Purchase
Planning
Civil
Public Relations Officer
Legal
Statistics
Secreterial Branch
   
 
 
भांडार व खरेदी खाते, रा. प. मुंबई
 
भांडार व खरेदी खात्याच्या कामकाजा विषयी संक्षिप्त टिप्पणी

रा.प. महामंउळाच्या वापरातील सुमारे १६००० गाड्यांच्या दैनंदिन देखभाल, दुरूस्ती व पुनर्स्थितीकरणासाठी लागणारे सर्व सुटे भाग, बसबॉडी दुरूस्तीसाठी लागणा-या, इतर सर्वसाधारण वस्तू, मध्यवर्ती कार्यशाळांमध्ये नवीन बस गाड्यांचे निर्मितीसाठी लागणा-या सर्वसाधारण वस्तू, इंजिन, एफ आय पंप, पुन:र्स्थितीकरणासाठीचे सुटेभाग, टायर पुन:स्तरणासाठी लागणा-या वस्तूं, प्रवाशी तिकीटे व इतर विविध प्रकारचे फॉर्मस छपाईसाठी लागणारा कामद व मुद्रण साहित्य, कर्मचाऱ्यांना लागणारे गणवेशाचे कापड व इतर देयके, कार्यशाळांमधील यंत्रे-हत्यारे, कार्यालयीन वापराचे फर्निचर व स्टेशनरी, कार्यालयीन उपकरणे इ. वस्तूंची खरेदी, साठा व वितरण हे भांडार व खरेदी खात्याकडून केले जाते. ही कार्यप्रमाणाली पुढील नमूद केलेल्या स्थरांवर होते.

महामंडळातील भांडार व खरेदी खात्याची संरचना
महामंडळाचे मध्यवर्ती कार्यालय मुंबई येथे स्वतंत्र भांडार व खरेदी विभाग कार्यरत आहे. या खात्याचे प्रमुख महाव्यवस्थापक (भांडार व खरेदी) असून त्यांच्या अधिपत्याखाली खाली घटक स्तरावर भांडाराची कार्यप्रणाली चालते.

१) मध्यवर्ती प्रिटींग प्रेस व भांडार विभाग कुर्ला, मुंबई.
या ठिकाणी महामंडळास आवश्यक असणा-या तिकिटांची व मूल्यवर्धीत फॉर्मसहित इतर महत्वाच्या प्रिटींग आयटेमची छपाई करून सर्व विभागांना पुरवठा केला जातो. तसेच काही सर्वसाधारण वस्तूंचा पुरवठा विभागांना केला जातो.

२) प्रादेशिक कार्यालय (६)
उपासनी समितीचे शिफारसी प्रमाणे प्रादेशिक कार्यालयातील भांडार शाखा बंद करण्यात आलेली आहे. प्रादेशिक व्यवस्थापन समितीचे कार्य हे विभागीय व्यवस्थापन समिती गटीत करून त्यंचे मार्फत भांडार संबंधीतचे निर्णय घ्यावेत असे मध्यवर्ती कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

३) मध्यवर्ती कार्यशाळा (३)
मध्यवर्ती कार्यालय भांडार व खरेदी खात्याने केलेल्या दरकरारानुसार आवश्यक वस्तुंचे खरेदी आदेश आकणे सांगाडे उत्पादनासाठी आवश्यक व इंजिन, एफ.आय.पी पून:स्तरीकरणासाठी लागणा-या आवश्यक सामानासाठी नियमित भांडारात उपलब्ध ठेवणे.

४) विभाग पातळीवर विभागीय भांडार (३२)
मध्यवर्ती कार्यालय भांडार व खरेदी खात्याने केलेल्या दरकरारानुसार आवश्यक वस्तुंचे खरेदी आदेश टाकणे व आवश्यक मालासाठीचा नियमित भांडारात उपलब्ध ठेवणे व अंतर्गत येणा-या सर्व आगारांना आवश्यकतेनुसार मालाचा पुरवठा करणे.

५) विभागाअंतर्गत आगार (२४८)
विभागीय पातळीवरील भांडाराकडून आगारास आवश्यक असणा-या सर्व प्रकारच्या सामानाची वेळोवेळी मागणी करून आगारात सामाना अभावी वाहन नादुरूस्त राहणार नाही याची दक्षता घेणे. यासाठी आगारातील भांडारात सामानाचा साठा उपलब्ध ठेवणे.

 
2010, MSRTC. All rights reserved. Site developed by National Informatics Centre, Navi Mumbai.