- रा.प. महामंडळाच्या मालमत्तेचे व सामुग्रीचे रक्षण करणे.
- अवैध प्रवासी वाहतूक तपासणी करण्यामध्ये वाहतूक विभागाला
मदत करणे.
- दक्षता : अफ़रातफ़र, आर्थिक गैरप्रकार व महामंडळाचे आर्थिक
नुकसान करणारी प्रकरणे उघडकीस आणणे.
- चौकशी : मा.मंत्री महोदय, अध्यक्ष महोदय व इतरांकडून प्राप्त
झालेल्या तक्रारीची चौकशी करणे.
- बस तपासणी : महामार्ग व निर्गम परिसरातील मार्गावर धावणा-या
रा.प.बसेसची वेळावेळी तपासणी करणे.
- प्रवाशांची सुरक्षितता : प्रवाशांची सुरक्षितता अबधित रहावी
म्हणून रा.प. महामंडळाच्या बसेसवर काम करणारे चालक मद्यपान
करुन अति वेगाने व निष्काळजीपणाने बस चालवितात किंवा कसे ?
याची शहानिशा करणे.
- कोट्यावधी रुपयांचे इंधन, वंगण, भांडार सामानाची खरेदी केल्यावर
त्याची आवक / जावक व्यवस्थित होते किंवा नाही त्याबद्दलची
तपासणी करणे.
- रा.प.चे कोट्यावधी किंमतीचे भंगार माल विकल्यावर त्याचे
वितरण करतांना गैरप्रकार होवू नये म्हणून त्यावर देखरेख ठेवणे.
सुरक्षा व दक्षता खात्याने एप्रिल,२००४ ते मार्च,२००५
तसेच एप्रिल,२००५ ते मार्च,२००६ या कालावधीत केलेल्या कामगिरीचा
तपशील खालीलप्रमाणे :-
सुरक्षा व दक्षता खात्याने २००४-०५ या कालावधीत एकूण १,१३,२५१
बसेस तपासल्या असून, वाहकाची ५,०७० अपहार प्रकरणे उघडकीस आणली
आहेत. त्याची अंतर्भूत रक्कम रु. ३,१४,२१५/- इतकी आहे. तसेच,
चोरटी प्रवासी वाहतूक करणारी एकूण १०,६५८ वाहने पोलिस व आर.टी.ओ.
च्या मदतीने पकडली असून, त्यांची एकूण अंतर्भूत रक्कम रु. २६,२७,६०९/-
इतकी आहे. सुरक्षा व दक्षता खात्याने एकूण २०२ दक्षता प्रकरणे
उघडकीस आणली असून, २३८ चौकशी प्रकरणे हाताळली आहेत. रा.प. मालमत्तेची
चोरी होवू नये म्हणून सुरक्षा व दक्षता कर्मचारी हे रात्रफ़ेरी
व रात्रवस्ती करीत असतात. त्यांनी एकूण ६,५६२ रात्रफ़े-या केल्या
असून, ६,४५२ रात्रवस्त्या केल्या आहेत.
तसेच सुरक्षा व दक्षता खात्याने २००५-०६ या कालावधीत एकूण ९७,२७९
बसेस तपासल्या असून, वाहकाची ४,२५७ अपहार प्रकरणे उघडकीस आणली
आहेत. त्याची अंतर्भूत रक्कम रु. ३,२८,७२५/- इतकी आहे. तसेच,
चोरटी प्रवासी वाहतूक करणारी एकूण १०,५११ वाहने पोलिस व आर.टी.ओ.
च्या मदतीने पकडली असून, त्यांची एकूण अंतर्भूत रक्कम रु. ३७,२८,०४६/-
इतकी आहे. सुरक्षा व दक्षता खात्याने एकूण १७५ दक्षता प्रकरणे
उघडकीस आणली असून, ४६५ चौकशी प्रकरणे हाताळली आहेत. रा.प. मालमत्तेची
चोरी होवू नये म्हणून सुरक्षा व दक्षता कर्मचारी हे रात्रफ़ेरी
व रात्रवस्ती करीत असतात. त्यांनी एकूण ६,३५२ रात्रफ़े-या केल्या
असून, ५,३६० रात्रवस्त्या केल्या आहेत.
|