प्रास्ताविक :-
प्रवासी वाहतूकीसारख्या सार्वजनिक उपक्रमामध्ये जनसंपर्काला
अनन्य साधारण महत्व आहे. जनसंपर्क हे महामंडळ आणि प्रवासी यांच्यामधला
महत्वाचा दुवा आहे. जनमानसात महामंडळाची प्रतिमा उंचविण्याची
महत्वाची भूमिका जनसंपर्क शाखा पार पाडते.
इतिहास :-
महामंडळाच्या स्थापनेनंतर लगेचच सन १९४९ मध्ये महामंडळात जनसंपर्क
शाखा सुरु करण्यांत आली. प्रारंभी जनसंपर्क शाखेचे मह्त्वाचे
कार्य प्रवासी वाहतूकीच्या राष्ट्रीयीकरणासाठी अनुकूल वातावरण
निर्माण करणे तसेच खाजगी वाहतूकीच्या प्रचाराविरोधात जनमानसात
राष्ट्रीयकॄत प्रवासी वाहतूकीचे महत्व बिंबविणे हे होते. कालांतराने
जनसंपर्काच्या भूमिकेत परिस्थितीनुरुप बदल होत गेला व त्या त्या
प्रसंगानुरुप जनसंपर्काचे काम केले गेले. परंतू महामंडळ आणि
प्रवासी यांच्यात सलोख्याचे संबंध प्रस्थापित करण्याची जबाबदारी
नेहमीच जनसंपर्क शाखा पार पाडते.
संरचना :-
संपूर्ण महामंडळाची जनसंपर्काची बहुतेक कामे मध्यवर्ती कार्यालयातील
जनसंपर्क शाखेमार्फ़त हाताळली जातात. सध्या जनसंपर्क शाखा सचिव,
म.रा.मा.प. महामंडळ यांच्या अधिपत्याखाली कार्यान्वित आहे. जनसंपर्क
शाखेचे प्रमुख, जनसंपर्क अधिकारी असून, सहाय्यक कर्मचारीवर्ग
अधिकारी , १ पर्यवेक्षक, १ लघुलेखक, २ वरिष्ठ कारकून, २ कनिष्ठ
कारकून, १ टंकलेखक व शिपाई यांच्या सहाय्याने या शाखेचे कामकाज
करण्यात येत आहे. विभागीय स्तरावर विभाग निमंत्रकांमार्फ़त स्थानिक
जनसंपर्काबाबतचे काम पाहीले जाते.
धोरण :-
प्रवाशांना पुरेशी, कार्यक्रम, किफ़ायतशीर, सुरक्षित व दर्जेदार
सेवा देण्याचे महामंडळाचे धोरण राबविताना महामंडळाशी संबंधित
सर्व लोक समुहासोबत सलोख्याचे व सौहार्दाचे संबंध प्रस्थापित
करुन महामंडळाची जनमानसातीला प्रतिमा उंचाविणे.
कामाचे स्वरुप :-
जनसंपर्क शाखेच्या कामाचे स्वरुप खालीलप्रमाणे आहे.
प्रसार माध्यमांशी चांगले संबंध प्रस्थापित करणे जनमानसातीला
प्रतिमा उंचविण्यासाठी तसेच जनतेशी चांगले संबंध निर्माण करण्याच्या
दॄष्टीने प्रसिध्दी माध्यमांचा उपयोग केला जातो. महामंडळाद्वारे
राबविल्या जाणा-या उपक्रमांची माहिती जनतेला व्हावी या दॄष्टीने
प्रसिध्दी पत्रके प्रसारीत केली जातात तसेच पत्रकार परीषदा व
पत्रकार दौरे आयोजित केले जातात. वरिष्ठ अधिका-यांच्या मुलाखतीही
वृत्तवाहिन्यांवर आयोजित केल्या जातात.
एस.टी. महामंडळाशी संबंधी वृत्तपत्रातून येणा-या बातम्यांची
कात्रणे काढून प्रवाशांच्या सूचना तक्रारी बाबत दखल घेऊन योग्य
ती कार्यवाही करणे तसेच टिकात्मक वृत्तांची योग्य ती चौकशी करून
वस्तूस्थिती दर्शक समर्पक खुलासा करणे.
जाहिरात मोहिम राबविणॆ :- महामंडळाची प्रतिमा
उंचविण्यासाठी महामंडळाच्या प्रवासीभिमुख विविध योजना लोकांना
अवगत करून एस. टी. सेवेकडे आकर्षित करण्यासाठी जाहिराती तयार
करून त्या जाहिरात मोहिमेंतर्गत वृत्तपत्र, इलेक्ट्रोनिक व इतर
माध्यमांद्वारे प्रसिध्द करणे.
प्रवासी तक्रारींची दखल घेऊन त्यांचे निराकरण करणे.
महामंडळाच्या नूतन वास्तूंचे उदघाटन, भूमीपूजन समारंभ आयोजित
करणे व त्या अनुषंगाने होणा-या खर्चावर नियंत्रण ठेवणे.
महामंडळाचे मुखपत्र ’परिवहन पथिक’ साठी येणा-या साहीत्याचे
संकलन, संपादन करून अंकाच्या छपाई व वितरण संबंधिची कामे करणे.
या त्रैमासिकाद्वारे महामंडळाचे विविध उपक्रम व योजनांची माहिती
दिली जाते. तसेच कर्मचा-यांनी व त्यांच्या पाल्यांनी केलेल्या
चांगल्या कामगिरीबद्दल त्यांना प्रोत्साहित केले जाते.
विविध प्रचार साहीत्य जसे भिंतीपत्रके, स्टिकर्स, आवाहन पत्रके
व दूरध्वनी निर्देशिका यांची छपाई व वितरण करणे.
राज्यातील वॄत्तपत्रांची मान्यताप्राप्त यादी तयार करुन निविदा,
नोकरभरती, सूचना इत्यादी वेळोवेळी त्या त्या वॄत्तपत्रांतून
प्रसिध्द करणे.
राजशिष्टाचाराशी निगडीत कामे व अती महत्वाच्या मान्यवरांच्या
भेटीसंबंधी कामे.
उद्दिष्टे :-
एस.टी. महामंडळाचा व्यवसाय हा सार्वजनिक क्षेत्रात येते असल्याने
एकाच वेळी खाजगी व शासकीय अशा दोन्ही पातळीवर जनसंपर्काचे कार्य
करावे लागते. खाजगी क्षेत्रात कार्य करणा-या संस्थेचा उद्देश
उत्पादीत वस्तूंची विक्री करुन नफ़ा मिळविणे हा असतो. तर शासकीय
संस्थेचा उद्देश लोककल्याणकारी योजना तयार करुन त्याची अंमलबजावणी
करणे तसेच तयार केलेल्या योजना, घेण्यात आलेले निर्णय इत्यादींची
माहिती जनतेपर्यन्त पोहोचविणे हा असतो.
एस. टी. महामंडळ राज्यात, शहरी व ग्रामीण भागात "रस्ता
तेथे एस.टी." या तत्वावर किंबहुना दुर्गम आदिवासी भागात
तोटा सहन करुन दर्जेदार, नियमित, किफ़ायतशीर, वक्तशीर, आरामदायी
व सुरक्षित प्रवासाची हमी देऊन सेवा देते. आजच्या स्पर्धात्मक
युगात एस.टी. सेवा अधिकाधिक लोकभिमुख होण्यासाठी आखलेल्या योजना
तमाम जनतेपुढे पोहोचवून त्यांचा सहभाग मिळवावयाचा असतो. हे साध्य
करतांना जनसंपर्क शाखेची मुख्य उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत.
- महामंडळाची प्रतिमा उंचविणे
- महामंडळाला सदिच्छा मिळवून देणे.
- महामंडळाच्या उद्दिष्ट पूर्तीसाठी प्रयत्न करणे.
- महामंडळाचे व्यावसायिक व धंदेवाईक उद्दिष्ट साध्य करणे.
- महामंडळाची ध्येय - धोरणे जनतेपर्यन्त पोहोचविणे.
- महामंडळाशी संबंधित सर्व प्रकारच्या लोकसमुहांसोबत सलोख्याचे
व सोहार्दाचे संबंध निर्माण करणे.
- एस.टी. सेवांबाबत जनजागॄती करणे.
- महामंडळाविषयी प्रवाशांमध्ये काही गैरसमज असल्यास त्याचे
निराकरण करणे.
कार्यक्षेत्र :-
- प्रसार माध्यम
- प्रवासी जनता
- कर्मचारी
- राज्यातील सर्व घटक
संपर्क अधिकारी १) जनसंपर्क अधिकारी : २३०७५५३९
दूरध्वनी क्रमांक २३०७१५२४
विस्तारीत क्रमांक २१५
२) सहाय्यक कर्मचारी अधिकारी : २३०७१५२४
विस्तारीत क्रमांक २१६
फॅक्स क्रमांक २३०७५५३९
|