M.S.R.T.C. Buses
   
 
Traffic
Mechanical
Personnel
Security & Vigilance
Accounts
Stores & Purchase
Planning
Civil
Public Relations Officer
Legal
Statistics
Secreterial Branch
   
 
 
Mechanical
 
महाराष्ट्र राज्य परिवह

कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियाकरिता राबविण्यात येणा-या कल्याणकारी योजना
रा. प. महामंडळातील एक लाखाहून अधिक कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी खालीलप्रमाणे व

१) कामगार कल्याण केंद्र
काही विभागाच्या मुख्यालयाच्या ठिकाणी कर्मचारी कल्याण केंद्रे स्थापन करण्यात आलेली आहेत. त्यांची देखभाल करण्यासाठी स्त्री कल्याण मार्गदर्शकांची नेमणूक करण्यात आली आहे; या केंद्रातून खालीलप्रमाणे कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.
अ) कर्मचा-यांच्या मुलांसाठी बालवाडी (माँटेसरी) वर्ग,
ब) पाक शास्त्राचे वर्ग,
क) शिवणकाम व भरतकामाचे वर्ग,
ड) कर्मचारी कुटुंबियांसाठी विविध खेळांच्या स्पर्धाचे आयोजन,
इ) कर्मचारी कुटुंबियांसाठी सहली

२) कर्मचारी वसाहत
कर्मचाऱ्यांसाठी निरनिराळ्या विभागातून राहण्यासाठी घरे बांधली असून त्यापैकी १,१८१ घरे औद्योगिक कामगारांना व १,१२४ घरे इतर कामगारांना देण्यात आली आहेत.

३) हॉलीडे होम्स
कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना सहलीसाठी महाबळेश्वर येथे गेल्यानंतर राहण्याची गैरसोय होऊ नये या हेतूने ४ सूटसची सोय केलेली आहे.

४) सहकारी संस्था
सहकारी चळवळीस उत्तेजन देण्याच्या दृष्टीने कर्मचा-यांच्या सहकारी ग्राहक संस्था व पतसंस्था यांना काही सवलती दिल्या जातात. पुणे, मध्यवर्ती कार्यशाळा दापोडी, सांगली, नागपूर, गडहिंग्लज, मध्यवर्ती कार्यालय मुंबई येथे असणा-या सहकारी ग्राहक संस्थांचे कार्य समाधानकारक असून जास्तीत जास्त कर्मचारी व त्यांचे कुटुंबिया या संस्थांचा लाभ घेत आहेत. महामंडळाचे जे ट्रक भांडार सामानाची ने आण करतात त्यातून या सहकारी संस्थांच्या धान्यादि माल वाहतूकीची मोफत सोय करण्यात आलेली आहे.

५) कुटुंबियाकरीता मोफत प्रवास पत्रिका
महामंडळाने कर्मचारी व त्यांच्यावर अवलंबून असणा-या ६ व्यक्तींना दर वर्षी २ वेळा (दर सहा महिन्यांनी) मोफत प्रवास पत्रिका देण्यात येते. सदर मोफत प्रवास पत्रिकेची मुदत एक महिन्याची असते व महामंडळाच्या साध्या जेथे जेथे जातात त्याठिकाणी कर्मचारी या मोफत प्रवास पत्रिकेवर प्रवास करू शकतात. तसेच निम आराम गाडीतून साधी गाडी व निम आराम गाडीच्या भाड्यातील फरक भरून प्रवास करण्याची मुभाही कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली आह

६) सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या मुलांना नोकर भरतीचे वेळी प्राधान्य
सेवा निवृत्त झालेल्या व एका वर्षात सेवा निवृत्त होणा-या कर्मचा-यांच्या मुला/मुलींना नोकर भरतीच्या वेळी प्राधान्य देण्यात येते. तसेच अशा मुलांना मुलाखतीमध्ये दिड गुण जादा दिला जातो.

७) वैद्यकीय सुविधा
महाराष्ट्रात एकूण १५४ ठिकाणी महामंडळाचे दवाखाने असून, त्या ठिकाणी मानसेवी वैद्यकीय अधिका-यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी मानसेवी वैद्यकीय अधिका-यांच्या मदतीला पूर्णवेळ मिश्रक नेमलेले असून, इतर ठिकाणी अंशकालीन मिश्रण काम करतात. कर्मचारी व त्यांचे कुटुंबिय दवाखान्यात उपचार घेत असतात. कर्मचारी व त्यांचे कुटुंबिय यांनी त्यांच्या आजारपणासाठी बाहेरील घेतलेल्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती केली जाते. तसेच काही हॉस्पीटल्समध्ये कर्मचा-यांच्या उपचारासाठी खाटा आरक्षित करण्यात आलेल्या आहेत. सेवा निवृत्त कर्मचा-यांना रा.प. दवाखान्यात मोफत वैद्यकीय सल्ला व उपलब्ध औषधे मोफत दिली जातात.

अत्यंत तातडीच्या अशा २३ प्रकारच्या आजारांसाठी कर्मचारी व त्यांचे कुटुंबिय यांना वैद्यकीय उपचार घेणे सुलभ व्हावे यासाठी प्रतीथयश हॉस्पीटल्सशी करार करण्यात आला असून, या आजारांमध्ये हृदय रोग शस्त्रक्रिया, रक्ताचा कर्करोग, किडनी रोपण शस्त्रक्रिया इत्यादींचा अंर्तभाव होतो. अशा आजार प्रसंगी अग्रीम देण्याची तरतूद देखील आहे.

८) शैक्षणिक सहाय्य, नैसर्गिक आपत्ती इ. प्रसंगी सहाय्य व मृत्यू प्रसंगी सहाय्य योजना
या योजनेसाठी सर्व कर्मचा-यांकडून प्रतिवर्ष रुपये १२/- व तेवढेच अंशदान महामंडळाकडून देण्यात येते. सदर निधीमधून पुढील प्रमाणे योजना राबविण्यात येतात.

अ) शिष्यवृत्ती योजना
एस.एस.सी. परिक्षेत ६०% पेक्षा जास्त गुण मिळणाऱ्या कर्मचा-यांच्या मुलां/मुलींना उच्च शिक्षणासाठी प्रत्येक विभागासाठी घटकांस                                                    ाठी १० या प्रमाणे शिष्यवृत्त्या देण्यात येतात, त्या पुढील प्रमाणे:
१) २ वर्षे किंवा त्यापेक्षा कमी कालावधीत जॉब ओरिएंटेड कोर्ससाठी रु. ७५/- द. म.
२) कला, विज्ञान, वाणिज्य व २ वर्षापेक्षा जास्त कालावधीच्या जॉब ओरिएंटड कोर्ससाठी रु. १००/- द. म.
३) अभियांत्रिकी, वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठी

ब) बक्षिस योजना
एस.एस.सी. परिक्षेत ६०% पेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या कर्मचा-यांच्या मुला/मुलींना दरवर्षी एकूण १०० बक्षिसे गुणानुक्रमे देण्यात येतात.
(१) पहिले २० विद्यार्थी (२० बक्षिसे)                  प्रत्येकी रुपये १५०/-
(२) २१ ते ४० क्रमांकाचे विद्यार्थी (२० बक्षिसे)     प्रत्येकी रुपये १२०/-
(३) ४१ ते ७० क्रमांकाचे विद्यार्थी (३० बक्षिसे)     प्रत्येकी रुपये ९०/-
(४) ७० ते १०० क्रमांकाचे विद्यार्थी (३० बक्षिसे)    प्रत्येकी रुपये ६०/-

क) नैसर्गिक आपत्ती प्रसंगी सहाय्य
दंगे, पूर, भूकंप, आग, वीज कोसळणे, अतिवृष्टी अशा नैसर्गिक आपत्तीमुळे कर्मचा-यांच्या मालमत्तेचे नुकसान झाले असेल व तसे शासन जाहीर करीत असेल तर अशा कर्मचा-याला रुपये ५००/- एवढे आर्थिक सहाय्य या योजनेअंतर्गत देण्यात येते.

ड) मृत्यू प्रसंगी अर्थ सहाय्य/कुटुंब कल्याण योजना
कर्मचारी सेवेत असताना मृत्यू पावल्यास अंत्यविधीसाठी रुपये २,०००/- चे अर्थ सहाय्य तातडीने दिले जाते.
मृत कर्मचा-यांच्या वारसास त्यास अनुज्ञेय असलेल्या उपदान, भविष्य निर्वाह निधी व्यतीरिक्त रुपये एक लाखाचे अर्थसहाय्य कुटूंब कल्याण योजनेखाली दिले जाते. या योजनेनुसार प्रत्येक कर्मचारी/अधिका-यांच्या वेतनातून दरमहा रुपये ४०/- प्रमाणे कपात केली जाते. यामध्ये महामंडळ रुपये एक कोटी पन्नास लाख दरवर्षी अनुदान देते. या योजनेखाली रुपये १,००,०००/- (एक लाख) महामंडळाच्या मुदत ठेव योजनेत, पाच वर्षासाठी जमा केले जातात व त्यावरील व्याज दरमहा मृत कर्मचा-यांच्या वारसास अदा केले जाते. पाच वर्षाचा कालावधी संपल्यानंतर सदर मुदत ठेव पुनर्गुंतवणूक करणे वा काढून घेणे हे वारसाच्या मर्जीवर अवलंबून आहे.

९) कुटुंब नियोजन
लोकसंख्येस आळा बसावा व कुटूंब नियोजन कार्यक्रमास प्रोत्साहन मिळावे यासाठी पुरूष कर्मचारी किंवा त्याच्या पत्नीने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास त्यांना खालील प्रमाणे रोख स्वरूपात बक्षिसे दिली जातात.
  पुरूष स्त्री
   नसबंदी शस्त्रक्रिया
अ) दोन किंवा त्यापेक्षा कमी अपत्य असताना शस्त्रक्रिया केल्यास, रुपये १००/- रुपये १००/-
ब) तीन अपत्य असतांना शस्त्रक्रिया केल्यास, रुपये ५०/- रुपये ५०/-
क) चार किंवा त्यापेक्षा जासत अपत्य असताना शस्त्रक्रिया केल्यास, रुपये ४०/- रुपये ४०/-

वरील प्रमाणे रोख बक्षिसांशिवाय पुढील प्रमाणे सवलती देखील कर्मचाऱ्यांना देण्यात येतात.
अ) जो पुरूष कर्मचारी नसबंदी शस्त्रक्रिया करवून घेत असेल त्यांना ६ दिवसाची खास रजा देण्यात येते.
ब) स्त्री कर्मचारी ‘‘तांबी’’ बसवून घेत असेल तर ज्या दिशी ‘‘तांबी’’ बसविण्यात येते त्या दिवसाची खास रजा देण्यात येते.
क) कर्मचा-यांची पत्नी जर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करवून घेत असेल तर त्यांना कर्मचा-याला ७ दिवसाची खास रजा देण्यात येते.
ड) एखादी स्त्री कर्मचारी जर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करवून घेत असेल तर तिला १४ दिवसाची खास रजा देण्यात येते.

१०) उत्सव अग्रीम
    कर्मचा-यांना त्यांचे सण साजरे करण्यासाठी सहाय्य व्हावे यासाठी विनाव्याजी रुपये १,५००/- उत्सव अग्रीम त्यांचे इच्छेनुसार वर्षातून एकदा दिला जातो व त्याची कपात समान १० हप्त्यात केली जाते.

११) घरबांधणी अग्रीम
    कर्मचा-यांना स्वत:चे घर खरेदीचे स्वप्न साकार व्हावे यासाठी शासनाच्या नियमाप्रमाणे व निधी उपलब्धतेनुसार घरबांधणी अग्रीम दिला जातो.

१२) खेळ क्रीडा
    कर्मचा-यांच्या क्रीडा गुणांना वाव मिळावा यासाठी दरवर्षी वार्षिक क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येतात सर्व विभागातून साधारणत: ५०० कर्मचारी या क्रीडा महोत्सवात भाग घेत असतात. वार्षिक क्रीडा स्पर्धामध्ये निरनिराळे मैदानी खेळ, कबड्डी, कुस्ती, व्हॉलीबॉल इ. स्पर्धा घेण्यात येतात ए.एस.आर.टी.यु. च्या स्पोर्टस कंट्रोल बोर्डाने आयोजित केलेल्या विविध क्रीडा स्पर्धामध्ये महामंडळाचा संघ भाग घेत असतो यामध्ये क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल, कबड्डी, बॅडमिंटन, टेबलटेनिस, हॉकी, कॅरम व मैदानी खेळ यांचा समावेश होतो.
    महामंडळातील कर्मचा-यांना शिवछत्रपती पुरस्कार/अर्जुन पुरस्कार मिळाल्यास रुपये ५,०००/- चे बक्षिस देऊन गौरव करण्यात येतो आतापर्यंत महामंडळातील ७ कर्मचा-यांना शिवछत्रपती पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

आंतर विभागीय क्रिकेट स्पर्धा
    दरवर्षी आंतरविभागीय क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. यामध्ये सर्व विभागातील क्रिकेटपटू भाग घेत असतात. विजयी व उपविजयी संघातील खेळाडू तसेच उत्कृष्ठ फलंदाज, उत्कृष्ठ गोलंदाज, मॅन ऑफ दी सिरीज ठरणा-या खेळाडूंना रोख बक्षिसे दिली जातात.
आंतर विभागीय नाट्यस्पर्धा
    कर्मचा-यांमधील अभिनय, कला गुणांना प्रदर्शित करण्याची संधी मिळावी यासाठी दरवर्षी आंतर विभागीय नाट्यस्पर्धा घेण्यात येतात. या स्पर्धेसाठी मिळणारा प्रतिसाद पाहून चार केंद्रावर प्राथमिक फेरी व अंतिम स्पर्धा केंद्रावर घेण्यात येते. कर्मचा-यांबरोबरच त्यांचे कुटुंबिय देखील या स्पर्धामध्ये भाग घेत असतात. अनेक कर्मचा-यांनी दूरदर्शन, मराठी, नाट्यसृष्टीतही चांगले नाव कमावले आहे.
    ‘‘गुणवंत कामगार’’ पुरस्कार प्राप्त झालेल्या कर्मचा-यांचा महामंडळाकडून उचित गौरव करण्यात येतो.

१३) कामगार कल्याण समित्या
    कर्मचा-यांच्या कल्याण विषयक बाबींचे आयोजन व नियमन करण्यासाठी सर्व विभाग/घटकांमध्ये कामगार कल्याण समित्या केलेल्या आहेत सदर समित्यांमध्ये व्यवस्थापन व कामगार प्रतिनिधींचा समावेश असतो.

    वरील सर्व कल्याणकारी योजना अंमलात आणण्यासाठी महामंडळ दरवर्षी आर्थिक तरतूद अंदाजपत्रकात करीत असते व त्यानुसार या योजनांसाठी निधी उपलब्ध करून दिला जातो.
ars and 7 years of the bus life) is carried out.

Depot Workshops.

ME Department is having 248 Depot Workshops for daily maintenance and running repairs of the buses. The main jobs carried out are as follows.

Daily Maintenance.
Decadely Maintenance.
Engine Oil Change.
By-Monthly Docking.
Running repairs.

These Depot Workshops are equipped with sub stores for making various spare parts material available required for above repairs.

Tyre Retreading Plants.

ME Department is controlling 9 Tyre Retreading Plants wherein the retreading and service repairs of tyres by precured process is carried out in order to provide required no. of rtd. tyres for the division. The TRPs are situated at C.W.Pune, Kolhapur, Nagpur, Nanded, Jalgaon, Nashik, Latur, Amravati and Ratnagiri.

Mechanical Performance. ME Department is continuously monitoring the mechanical performances of all the passenger buses and keeping them in healthy condition by way of continuous technical observation, technical innovations, training to the mechanical staff and introduction of modern equipments. Because of these all out efforts ME Department could achieve better performances in respect of fuel efficiency, consumption of new tyres etc. as follows.

Sr.No. Particulars Performance of 2005-06 Target for 2006-07
1. KPTL 48.93 52.00
2. %Fleet Utilisation 93.16 95.00
3. Spring Consumption per lakh kms. (In Kg.) 170 130
4. Consumption of new tyre per lakh kms. 3.67 3.95
5. %Rtd. of new tyres 98.32 99.35
6. %Retd. Of rtd. tyres 73.06 80.35


Bus Body Design and changes thereof.
In order to provide better comforts and attractive passenger buses to the traveling commodity, ME Department is continuously working on the Bus Body
Design and required changes through its R&D Wing.

Changes in Ordinary buses.
Seat angle increased from 100 to 105.
Wider Sliding Windows.
Provision of head rest to the seats.
Provision of tube lights in the passenger saloon instead of bulbs.

Front passenger door.
Attractive colour scheme.
Provision of good quality type 'A', Grade '1' Rexine for seats.
Improved driver seat.
The proposed changes in the ordinary buses are as follows.
Single piece wind shield glass.
Electrical buzzers instead of bell and rope.
Magazine pouch.
Hand rest bar, staunchion bar, grab rail, decency partition etc. of stainless steel.
Luggage Booth.

Hi-Tech Deluxe AC buses.
ME Department is operating Hi-Tech Deluxe AC buses including 20 Volvo buses. The main features of these Hi-Tech Deluxe AC buses are as follows.
Air suspension.
Comfortable reclining push back seats.
Comfortable distance between two seats.
Attractive colour Scheme.
TV and VCR.
Pneumatically operated passenger door.
Luggage booth.

Special Features in MSRTC buses for disabled persons. Three seats are reserved for the disabled.
Support bar to the hand rest of the 3 seats specially reserved for disabled.
Provision of ring and Velcro belt for securing the crutches of the disabled near the reserved seats.
Height of the step pan is lowered from the ground floor.
Steps of the step pan are painted with different colour sheds.
Provision of support bars to the decency partition.
Provision of bulbs on the step pans.
Painting of instructions.
 
2010, MSRTC. All rights reserved. Site developed by National Informatics Centre, Navi Mumbai.