|
| |
| |
| पार्सल कुरियर योजना |
| |
नागरिकांना त्यांच्याकडील वस्तु / सामान एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी जलदरित्या पाठविणेकरिता एस.टी. महामंडळाच्या यंत्रणेचा उपयोग होऊ शकतो. त्याचप्रमाणे अशी सुविधा उपलब्ध करुन दिल्यास महामंडळासही अधिकचे उत्पन्न प्राप्त होते. ही बाब विचारात घेऊन सुरुवातीच्या कालावधीपासून प्रवासी वाहतूकीसमवेत पार्सल वाहतूक सेवा उपलब्ध करुन देण्यांत आलेली आहे.
या योजनेकरिता महामंडळाने संपूर्ण राज्याकरिता एकमेव खाजगी एजंटची नियुक्ती केलेली असून पार्सल सेवा वाहतूकीचे दर ठरविणे, व इतर अनुषंगिक अधिकार खाजगी एजंटसना देण्यांत आलेले आहेत.
महामंडळाच्या सर्व प्रमुख बसस्थानकांवर पार्सल कार्यालये असून त्याद्वारे नागरिकांना सक्षम पार्सल सेवा पुरविण्यांत येते.
|
| |
|
|
|