|
|
| |
| नागरिक सनद - प्रकरण-4 |
| |
विविध सेवाप्रकारनिहाय भाडे दरपत्रक
महामंडळ प्रवासी भाडे दर प्रत्येक सहा कि.मी.चा एक टप्पा या पध्द्तीने आकारीत आहे. तर शहरी सेवांकरिता प्रवासीभाडे 2 कि.मी.चा एक टप्पा यापध्द्तीने आकारण्यांत येते. 5 ते 12 वर्षापर्यंत वयोमर्यादा असणा-या प्रवाशांस प्रचलित भाडे दरपत्रकानुसार अर्धे तिकीट आकारणी करण्यांत येते. प्रवासी सामानाकरिता स्वतंत्र सामान वाहतूक भाडे दर आकारण्यांत येतात.
कमी अंतराचा प्रवास करणा-या प्रवाशांवर अतिरिक्त प्रवासभाडयाचा बोजा पडू नये याकरिता महामंडळाने 3 कि.मी. पर्यंतच्या प्रवासाकरिता उपटप्पा पध्दतीने 3 कि.मी. पर्यंतचेच प्रवास भाडे आकारण्याची सुविधा निर्माण केलेली आहे. सदर कार्यपध्द्ती 6 कि.मी. पेक्षा जास्त व 27 कि.मी. पर्यंतच्या प्रवासाकरिता अनुज्ञेय आहे. उदा. या कार्यपध्द्तीचा फायदा 9 कि.मी. पर्यंत प्रवास करणा-या प्रवाशाकडून फक्त 9 कि.मी.चेच म्हणजेच दीड टप्प्याचेच प्रवासभाडे आकारण्यात येते. सदर सवलत अनुज्ञेय नसती तर 9 कि.मी. च्या प्रवासाकरिता 12 कि.मी.चे म्हणजेच 2 टप्प्याचे भाडे आकारले गेले असते.
महामंडळाने प्रवासी गर्दीच्या हंगामानुसार कमी प्रवासभाडे आकारणी करण्याची कार्यपध्द्ती नुकतीच अवलंबविलेली आहे.
| सेवेचा प्रकार |
दिनांक 17.08.2006 पासून 6
कि.मी.च्या प्रति टप्प्याचे
दर. |
टिकमान प्रवासभाडे (एक
टप्प्याकरिता) दर |
| जनता सेवा |
3.06 |
3.00 |
| *शहरी सेवा |
3.00 |
3.00 |
| साधी/ जलद / रात्रसेवा |
3.78 |
4.00 |
| निम आराम |
4.49 |
5.00 |
| आराम / डिलक्स |
5.83 |
6.00 |
| वातानुकूलीत- शिवनेरी |
7.35 |
8.00 |
| वातानुकूलीत-महाबस |
6.56 |
7.00 |
* शहरी सेवेकरिता दोन कि.मी.चा एक टप्पा या दराने प्रौढ प्रवाशास रु.3/- व मुलास रु.2/- किमान भाडे आकारणी करण्यांत येते. प्रवास भाडे रुपयाच्या पटीत पुर्णांकात आकारण्यात येते. भाडे आकारणी पुर्णांकात करताना 50 पैशांपेक्षा कमी भाडे सोडून देण्यात येते. 50 व त्यापेक्षा जास्त भाडे पुढील रुपयाच्या पटीत आकारण्यात येते.
|
| |
|