2010, MSRTC. All rights reserved. Site developed by National Informatics Centre, Navi Mumbai.
   
  M.S.R.T.C. Buses
   
 
प्रकरण-1 नवीन बस सेवा सुरु करण्याची कार्यपध्दती
प्रकरण-2 रा.प.बसस्थानकांवरील सोयी सुविधा
प्रकरण-3 आकर्षक आरामदायी सेवा
प्रकरण-4 विविध सेवाप्रकारनिहाय भाडे दरपत्रक
प्रकरण-5 प्रवाशांना एस.टी. सेवेकडे आकर्षित करण्याकरिता प्रवासभाडे सवलत योजना
प्रकरण-6 आगाऊ आरक्षण सुविधा
प्रकरण-7 प्रासंगिक / नैमित्तिक करारावर बसची मागणी
प्रकरण-8 सवलत
प्रकरण-9 यात्रा उत्सव प्रवासी गर्दीचा हंगाम कालावधीत जादा प्रवासी वाहतूक व सामाजिक बांधिलक
प्रकरण-10 रा.प.महामंडळाच्या बसमधील राखीव आसन व्यवस्था
प्रकरण-11 रा.प.बसस्थानकावरील सामान वाहतुकीची/ हमालीची कार्यपध्दती व दर
प्रकरण-12 प्रवासी सामान वाहतुकीचे / हमालीचे दर
प्रकरण-13 प्रवाशाचे गहाळ झालेले व जमा असलेले असे सामान प्रवाशांना परत देण्याची कार्यपध्दती
प्रकरण-14 प्रवास भाडे परतावा  - नियम व कार्यपध्दती
प्रकरण-15 मार्गस्थ बिघाड
प्रकरण-16 प्रवासी तक्रार व सूचना
प्रकरण-17 अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांद्वारे प्रवास न करणेबाबत
प्रकरण-18 वार्षिक सवलत कार्ड योजना
 
 
नागरिक सनद - प्रकरण-3
 
आकर्षक, आरामदायी सेवा

प्रकरण -3 आकर्षक, आरामदायी सेवा सुरुवातीच्या कालावधीत प्रवासासंदर्भात नागरिकांची गरज / अपेक्षा ही किमान होती आणि त्या अंतर्गत केवळ एका ठिकाणाहून इच्छित ठिकाणी प्रवास सुविधा उपलब्ध असणे एवढीच किमान अपेक्षा प्रवासी / नागरिकांची होती. तथापि, अलिकडील कालावधीत सर्व व्यावसायिक क्षेत्रांत आमुलाग्र बदल झालेले आहे. परिणामी, नागरिकांची प्रवास विषयक गरज मोठया प्रमाणावर व सातत्याने निर्माण होत आहेत. नागरिकांना नोकरी, व्यवसाय, पर्यटन, शिक्षण, इत्यादि अनेकविध कारणांकरिता सतत व दिर्घ टप्प्याचा प्रवास करणे आवश्यक झालेले आहे. या सतत / दीर्घ टप्प्याच्या प्रवासामुळे प्रवाशांस किमान प्रवासाच्या गरजांशिवाय आरामदायी, सुखकर, जलद व सुरक्षित सेवेची आवश्यकता निर्माण झालेली आहे आणि नागरिकांच्या या गरजा पूर्ण करण्यासाठी महामंडळाने त्याची दखल घेऊन महामंडळाच्या वाहन ताफ्यात आकर्षक, आरामदायी, सुखकर अशा बसेसचा समावेश केलेला आहे. त्याचप्रमाणे, रा.प. बसेसच्या अंतर्गत व इतर रचनेमध्येही सुधारणा केलेली आहे. या अनुषंगाने महामंडळाने पुढील नमूद केलेल्या बसेस कालानुरुप समाविष्ट केलेल्या असून त्यांद्वारे नागरिकांना उच्चतम दर्जाची सेवा देण्यात येत आहे.

1.    वातानुकूलित व्होल्वो सेवा. 
2.    उच्च तंत्रज्ञानावर आधारित इरेझर सेवा.
3.    डिलक्स सेवा.
4.    निमआराम सेव.
5.    साधी सेवा.
6.    मिनी सेवा.
7.    मिडी सेवा.
8.    शहरी सेवा.


(1) वातानुकूलीत बस सेवा :
प्रवाशांची मागणी, गरज विचारात घेऊन महामंडळाने वाहन ताफ्यात विविध सोयीनी युक्त असलेल्या अत्याधुनिक तंत्राच्या बसेस समाविष्ट केलेल्या आहेत. महामंडळाने प्रवाशांना सुखकर प्रवास सुविधा मिळावी या हेतूने वातानुकूलित बसेस चालनात आणलेल्या आहेत. अलीकडील कालावधीत रस्ते प्रवासी वाहतुकीच्या वाहनांमध्ये आमुलाग्र क्रांती होऊन अत्याधुनिक बसेसची निर्मिती झालेली आहे. याची दखल महामंडळाने घेउँन उच्च तंत्राने युक्त असलेली व्होल्वो बस महामंडळाच्या ताफ्यात समाविष्ट केलेली असून या बसेसना ''शिवनेरी'' असे संबोधण्यात येत आहे. प्रवासी प्रतिसादानुसार सदर बसेसच्या संख्येत वाढ करण्यात येत आहे.

(2) मिनी व मिडी बस सेवा :
दुर्गम, आदिवासी व डोंगराळ भागाचा थेट रस्तेवाहतूकीद्वारे संप व्हावा यासाठी ज्या रस्त्यांवर 50 आसनी बस चालनात आणता येत नाही अशा रस्त्यांवर खास मिडी बससेवा सुरु करुन सामाजिक बांधिलकीची जाण ठेवलेली आहे आणि याद्वारे दुर्गम भागाचा विकास करण्यास हातभार लावलेला आहे. त्याचप्रमाणे, 200 मिनी बसेस प्रायोगिक तत्वावर चालनात आणलेल्या आहेत.

(3) साधी बस सेवा :
महामंडळाने साध्या बसेसची आसनक्षमता 55 वरुन 50 एवढी कमी करुन दोन प्रवासी बाकांमधील अंतर वाढवून अधिक सोय उपलब्ध करुन दिलेली आहे. त्याचप्रमाणे बाकांच्या रचनेमध्ये बदल करुन प्रवासी आसनव्यवस्था सुखकारक केलेली आहे. त्याद्वारे लांब पल्ल्याचा प्रवास सुखकर होईल यादृष्टीने कार्यवाही केलेली आहे. महामंडळाने प्रवाशांची प्रवास विषयक गरज, प्रवासभाडे अदा करण्याची आर्थिक कुवत, प्रवासाचा वेळ, प्रवासी चढ-उताराची ठिकाणे इत्यादी घटक विचारात घेऊन तीन प्रकारच्या सेवा साध्या बसेसद्वारे चालनात आणलेल्या आहेत. त्याचा तपशील पुढील प्रमाणे.

(अ) जनता बससेवा : दुर्गम, आदिवासी व डोंगराळ भागाचा थेट रस्तेवाहतूकीद्वारे संप व्हावा यासाठी ज्या रस्त्यांवर 50 आसनी बस चालनात आणता येत नाही अशा रस्त्यांवर खास मिडी बससेवा सुरु करुन सामाजिक बांधिलकीची जाण ठेवलेली आहे आणि याद्वारे दुर्गम भागाचा विकास करण्यास हातभार लावलेला आहे. त्याचप्रमाणे, 200 मिनी बसेस प्रायोगिक तत्वावर चालनात आणलेल्या आहेत.

(ब) जलद सेवा : सदर सेवा ही प्रामुख्याने मध्यम व लांब पल्ल्याच्या मार्गावर चालनात आणलेली आहे. मध्यम व लांब पल्ल्याच्या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांस इच्छित स्थळी कमी वेळात, जलद गतीने पोहोचणे ही गरज असते. प्रवाशांच्या या गरजेची पूर्ती करण्याकरिता महामंडळाने मध्यम व लांब पल्ल्याच्यामार्गावर कमी थांबे असलेल्या जलद सेवा सुरु केलेल्या आहेत. या अंतर्गत महामंडळाने विनाथांबा, एक थांबा इत्यादि सेवासुध्दा सुरु केलेल्या आहेत.

(क) रात्र सेवा : सुरुवातीच्या कालावधीत सुरक्षिततेच्या कारणास्तव फक्त दिवासाची प्रवासी सेवा उपलब्ध होती. मात्र, कालानुरुप प्रवाशांच्या बदलत्या गरजा, विचारात घेऊन महामंडळाने रात्र सेवा सुरु केलेली आहे. या सेवेस प्रवाशांचा चांगला प्रतिसाद प्राप्त झालेला असून त्याची दखल घेऊन महामंडळाने रात्र सेवांमध्ये आवश्यकतेनुसार वेळोवेळी वाढ केलेली आहे.

(4) निमआराम बस सेवा :
अलिकडील कालावधीत निमआराम बसेसना 2*2 बकेट-सीट आसन व्यवस्था उपलब्ध करुन देण्यांत आलेली आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवास सुखकर झालेला आहे. ही सेवा 'एशियाड बस' या नांवाने लोकप्रिय आहे.