रा.प.बसस्थानकांवरील सोयी सुविधा
नागरिकांची प्रवासादरम्यान कोणतीही
गैरसोय होऊ नये व त्यांना
उच्चत्तम दर्जाची प्रवासी सुविधा
उपलब्ध व्हावी याकरिता महामंडळाने
संपूर्ण राज्यात मोठया प्रमाणावर
विविध सोयी सुविधांनी युक्त
असलेल्या बसस्थानकांचे जाळे
उभारलेले आहे. या अंतर्गत महामंडळाने संपूर्ण राज्यात 575
बसस्थानके व 4280 प्रवासी निवारे
बांधलेली आहेत. सदर बसस्थानके व
प्रवासी निवारे निर्माण
करण्याकरिता महामंडळास मोठी
भांडवली गुंतवणूक करावी लागलेली
आहे. आणि आशा प्रकारे मोठया
प्रमाणावर भांडवली गुंतवणूक खाजगी
व्यवसायिकांकडून करण्यात आली नसती.
केवळ सामाजिक बांधिलकीची जाण ठेऊन
महामंडळाने ही यंत्रणा निर्माण
केलेली आहे. याअंतर्गत महामंडळाने
पुढील सुसूत्रित यंत्रणा उभारली
आहे.
1. आगार 247 2. बसस्थानके 575 3. प्रवासी निवारे 4280 4. उपहारगृहे व स्नॅकबार 1182 5. पुस्तकांची दुकाने 263 6. इतर वाणिज्य आस्थापना
1151
महामंडळाच्या बसस्थानकांवर
प्रवाशांकरिता प्रामुख्याने पुढील
सोयी सुविधा उपलब्ध करुन दिलेल्या
आहेत.
बसस्थानकांवर प्रवाशांसाठी
प्रतिक्षालय निर्माण केलेली असून
या प्रतिक्षालयात प्रवाशांना
बसण्यासाठी आसन व्यवस्था, खेळती
हवा रहावी याकरिता विद्युत पंखे,
पिण्याचे पाणी या सुविधा आहेत.
याशिवाय प्रवाशांना बसमध्ये चढ -
उतार करणे सुलभ व्हावी याकरिता
स्वतंत्र फलाटाची व्यवस्था केलेली
आहे. तसेच, प्रवाशांना बसेसच्या
आगमन / निर्गमनाची माहिती व्हावी याकरिता चौकशी कक्ष
व वेळापत्रक प्रसिध्द करण्यात आलेले आहे.
त्याचप्रमाणे, आगाऊ आरक्षण सुविधा,
पार्सल वाहतूक कार्यालय, क्लोकरुम
(सामानघर), विद्यार्थ्यांना /
प्रवाशांना पासेस देण्यासाठी
स्वंतत्र केंद्र, वैयक्तिक वजन
मशीन, सार्वजनिक दूरध्वनी केंद्र,
पोलीस औट पोस्ट, प्रथमोपचार पेटी,
स्वच्छता गृहे, उपहार गृहे, विविध
आस्थापना ( रसवंती, फळ ), वाहन तळ,
इत्यादी सुविधा उपलब्ध करुन
दिलेल्या आहेत. महामंडळाच्या
बसस्थानकावरुन बहुतांश बस फेऱ्या
सुरु / संपत असतात. परिणामी,
महामंडळाच्या बसेसद्वारे प्रवास
करणारा जास्तीत जास्त प्रवासी हे
महामंडळाच्या बसस्थानकावर
प्रवासानिमित्त येत असतात. अशा
प्रवाशांची कोणत्याही प्रकारे
गैरसोय होऊ नये याकरिता महामंडळाने
बसस्थानक व्यवस्थापनास प्राधान्य
दिलेले असून बसस्थानक
व्यवस्थापनासाठी स्वतंत्र कर्मचारी
पदे निर्माण करुन कर्मचारीवर्ग
नियुक्त करण्यात आलेला आहे.
याअंतर्गत सहाय्यक वाहतूक अधीक्षक,
वाहतूक निरीक्षक, सहाय्यक वाहतूक
निरीक्षक, वाहतूक नियंत्रक या
पर्यवेक्षिय कर्मचाऱ्यांची
नियुक्ती करुन कार्यक्षम प्रवासी
सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे.
प्रवासी प्रसाधनगृहे- प्रवाशांना नैसर्गिक विधीकरिता
आरोग्यदायी प्रसाधनगृहे उपलब्ध
करुन देणे ही प्राथमिक गरज आहे.
ही बाब विचारात घेता, महामंडळाने
सर्व बसस्थानकांवर प्रवासी
प्रसाधनगृहांची सोय निर्माण केलेली
आहे. प्रवासी प्रसाधनगृहे
आरोग्यदायी, स्वच्छ रहावीत याकरिता
महामंडळाने विशेष दक्षता घेतलेली
आहे. याअंतर्गत राज्यातील
महत्वाच्या 93 बसस्थानकांवर सुलभ
इन्टरनॅशनल या सेवाभावी संस्थेस
चालविण्याकरिता व देखभाल,
दुरुस्तीकरिता '' पैसे भरा व
वापरा '' या तत्वावर नियुक्त
केलेले आहे. त्याचप्रमाणे,
उर्वरीत बसस्थानकांवरसुध्दा खाजगी
सेवाभावी संस्थांना देखभाल व
दुरुस्तीकरिता नियुक्त करुन
त्यांचेमार्फत प्रवासी
प्रसाधनगृहाची देखभाल करण्यात येते.
प्रवासी प्रसाधनगृहाची स्वच्छता,
कर्मचाऱ्यांची गैरवर्तणूक, अवाजवी
वापरणावळ आकार वसूल करणे
इत्यादीबाबत प्रवाशांची तक्रार
असल्यास सदर तक्रार प्रसाधनगृह
परिचालकाकडे असलेले तक्रार पुस्तक,
बसस्थानकावरील तक्रार पुस्तक, लेखी
अर्ज इत्यादीद्वारे सूचना /
तक्रार करण्याची सुविधा आहे.
प्रवाशाने केलेल्या तक्रार /
सूचनांची तात्काळ दखल घेण्याची
पध्दत आहे. अपावादात्मक स्थितीत
तक्रार नोंदविल्यानंतर काही
कालावधीत दखल घेण्यात येऊन केलेली
कार्यवाही तक्रारकर्त्यास
कळविण्यात येते.
प्रवासी प्रसाधनगृह वापरणावळ आकार
1. महापालिका
हद्दितील बसस्थानके -
(अ)शौचकुपाच्या वापरासाठी - रु. 2/-
(ब)स्नानगृहाच्या वापरासाठी (प्रति
इसम )
- रु. 3/-
2. नगरपालिका व इतर
हद्दितील बसस्थानह्लोँ -
(अ)शौचकुपाच्या वापरासाठी
- रु. 1.50 पैसे
(ब)स्नानगृहाच्या वापरसाठी (प्रति
इसम)
- रु. 2/-
टिप :- प्रसाधनगृहाचा वापर
स्त्रिया व 12 वर्षाखालील
मुलांसाठी सर्व ठिकाणी मोफत आहे.
मुतारीचा वापर सर्व ठिकाणी
सर्वांसाठी मोफत आहे.
सामानघर सुविधा (क्लोकरुम)
प्रवाशांना प्रवास पूर्ण झाल्यावर
व इच्छित स्थळी उतरल्यावर
आपल्यासमवेतचे सर्वच सामान सोबत
घेऊन संबंधित गांवात जावयाचे नसते.
आणि त्या ठिकाणी / त्या गांवी
त्यांचा राहण्याचा कालावधी अत्यंत
अल्प असतो. अशा वेळी, प्रवाशांना
काही सामान बसस्थानकावर ठेवण्याची
सोय उपलब्ध असण्याची नितांत
आवश्यकता असते. प्रवाशांच्या या
गरजेची पूर्तता व्हावी याकरिता
महामंडळाने काही ठराविक
बसस्थानकांवर प्रवासी सामान
ठराविक कालावधीकरिता ठेऊन घेण्याची
सोय केलेली आहे. यापोटी महामंडळ
प्रवाशांकडून प्रति दिन प्रति डाग 01.25 पैसे या दराने आकार घेण्यात
येतो. तसेच, या सुविधेकरिता
कार्यालय सुरु होण्याची व बंद
होण्याची वेळ ही एक दिवस याकरिता
ग्राहय धरण्यात येते.
प्रवाशांना सामानघर सुविधेचा लाभ
घेताना त्यांनी त्यांचे जवळचे
सामान महामंडळाच्या सामानगृहात जमा
केल्यानंतर सामान जमा केल्याबद्दल
विहित नमुन्याची पावती प्रवाशास
देण्यात येते. तसेच, सामान परत
ताब्यात घेताना संबंधित प्रवाशाने
त्याचेकडे असलेली पावती परत देऊन
त्या पावतीप्रमाणे असलेले सामान
खात्री करुन घेऊन ताब्यात
घ्यावयाचे आहे व सामान
मिळाल्याप्रित्यर्थ स्वाक्षरी
करावयाची आहे.
रा.प.महामंडळाने प्रवाशांकरिता
निर्माण केलेल्या सोयी-सुविधा
प्राप्त करुन घेण्याविषयी
मार्गदर्शक तक्ता
|
अ.क्र. |
सोयी-सुविधांचा तपशील |
माहिती मिळण्याचे ठिकाण |
| 1. |
बसे फेऱ्यांच्या
वेळांबाबतची माहिती |
बसस्थानकावरील वेळापत्रक
फलक, चौकशी नियंत्रण
कक्षाकडे दूरध्वनी व
प्रत्यक्ष चौकशीद्वारे |
| 2. |
नैमित्तिक करारावर बस
मिळणेबाबतची माहिती व
मागणी नोंदविणेबाबत. |
संबंधित आगार व्यवस्थापक. |
| 3. |
मासिक / त्रैमासिक पास,
वार्षिक सवलत कार्ड,
आवडेल तेथे प्रवास,
विद्यार्थी सवलत पास इ.
मिळणेबाबत. |
संबंधितबसस्थानकप्रमुख |
| 4. |
स्वातंत्र्य सैनिक मोफत
पास, अधिस्विकृतीधारक
पत्रकार कुपन्स. |
संबंधित आगार व्यवस्थापक. |
| 5. |
आदिवासी सेवक, दलित मित्र,
अण्णाभाऊ साठे पुरस्कार्थी
पास. |
संबंधित विभाग नियंत्रक |
| 6. |
नवीन बस सेवा सुरु करणे. |
संबंधित विभाग नियंत्रक /
प्रादेशिकव्यवस्थापक |
| 7. |
अपघात नुकसान भरपाई रक्कम
मिळणेबाबत. |
ज्या विभागाची बस आहे, ते
विभागनियंत्रक |
|