M.S.R.T.C. Buses
   
 
प्रकरण-1 नवीन बस सेवा सुरु करण्याची कार्यपध्दती
प्रकरण-2 रा.प.बसस्थानकांवरील सोयी सुविधा
प्रकरण-3 आकर्षक आरामदायी सेवा
प्रकरण-4 विविध सेवाप्रकारनिहाय भाडे दरपत्रक
प्रकरण-5 प्रवाशांना एस.टी. सेवेकडे आकर्षित करण्याकरिता प्रवासभाडे सवलत योजना
प्रकरण-6 आगाऊ आरक्षण सुविधा
प्रकरण-7 प्रासंगिक / नैमित्तिक करारावर बसची मागणी
प्रकरण-8 सवलत
प्रकरण-9 यात्रा उत्सव प्रवासी गर्दीचा हंगाम कालावधीत जादा प्रवासी वाहतूक व सामाजिक बांधिलक
प्रकरण-10 रा.प.महामंडळाच्या बसमधील राखीव आसन व्यवस्था
प्रकरण-11 रा.प.बसस्थानकावरील सामान वाहतुकीची/ हमालीची कार्यपध्दती व दर
प्रकरण-12 प्रवासी सामान वाहतुकीचे / हमालीचे दर
प्रकरण-13 प्रवाशाचे गहाळ झालेले व जमा असलेले असे सामान प्रवाशांना परत देण्याची कार्यपध्दती
प्रकरण-14 प्रवास भाडे परतावा  - नियम व कार्यपध्दती
प्रकरण-15 मार्गस्थ बिघाड
प्रकरण-16 प्रवासी तक्रार व सूचना
प्रकरण-17 अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांद्वारे प्रवास न करणेबाबत
प्रकरण-18 वार्षिक सवलत कार्ड योजना
 
 
नागरिक सनद - प्रकरण-16
 
प्रवासी तक्रार व सूचना

रा.प.महामंडळाच्या वाहतूक सुविधेचा लाभ दैनंदिन 59 लाख प्रवासी घेत आहेत. त्याचप्रमाणे, सदरची सुविधा कार्यक्षमपणे पुरविण्यात यावी याकरिता महामंडळातील एक लाख कर्मचारीवर्ग सतत कार्यरत असतो. एवढया प्रचंड प्रमाणावर ग्राहकांशी दैनंदिन थेट संप असलेली रा.प.महामंडळ ही एकमेव संस्था आहे. त्याचप्रमाणे, ही संस्था निमशासकीय असल्याने नागरिकांच्या महामंडळाच्या सेवेबद्दल अपेक्षा या उंचावलेल्या असतात. या सर्वांची परिणिती महामंडळाकडून पुरविण्यात येणाऱ्या सेवेबाबत सूचना व तक्रार निर्माण होणे नैसर्गिक आहे. त्याचप्रमाणे, कोणत्याही संस्थेचे यश हे त्या संस्थेने निर्माण केलेल्या सेवेच्या दर्जावर व त्यामुळे ग्राहकाच्या होणाऱ्या समाधानाच्या पातळीवर असते. ही बाब विचारात घेऊन व ग्राहाकाचे समाधान हेच अंतिम उद्दिष्ट हे लक्ष ठेऊन महामंडळाने प्रवाशांकडून प्राप्त होत असलेल्या तक्रारी/सूचना व त्यांचा निपटारा करणे याकरिता स्वतंत्र कार्यपध्दती अंगीकारलेली आहे.

महामंडळाच्या सेवेसंदर्भातील सूचना/तक्रारी विविध माध्यमांद्वारे प्राप्त होत असतात. यामध्ये प्रसिध्दी माध्यमे ( वृत्तपत्रे, केबल, दूरदर्शन ), सूचना निवेदनपत्रे, लोक प्रतिनिधी/विविध सामाजिक घटक यांचेकडून प्राप्त झालेली निवेदने यांचा समावेश आहे. या सूचना/तक्रारी यांचा निपटारा करण्यासाठी महामंडळाने स्वतंत्र यंत्रणा निर्माण केलेली आहे. या अंतर्गत महामंडळाने प्रत्येक वाहकाकडे प्रवासी तक्रार पुस्तक दिलेले आहे. तसेच, प्रत्येक बसस्थानकांवर प्रवासी तक्रार व सूचना पुस्तक ठेवण्यात आलेले आहे. याद्वारे तसेच अन्य माध्यमांद्वारे प्राप्त झालेल्या सूचना/तक्रारी यांची शहानिशा करुन त्याबाबत उचित कार्यवाही त्वरित करण्यात येते.

प्रवाशांना त्यांच्या सूचना / तक्रारी या कर्तव्यावरील वाहकाकडे असलेले तक्रार पुस्तक, बसस्थानकावरील तक्रार पुस्तक, स्वतंत्र पत्राद्वारे केलेली सुचना / तक्रार, प्रसिध्दी माध्यमांद्वारे केलेली तक्रार, जनता अदालत, प्रवासी अदालत या अनेक विध मार्गाने उपस्थित करता येतात.  नागरिकांनी उपस्थित केलेल्या तक्रार / सूचना कालमर्यादेत निकाली काढण्यात येऊन केलेली कार्यवाही सूचनाकर्त्यास लेखी कळविण्यात येते.

प्रवासी सूचना व त्याचा निपटारा याबाबत मार्गदर्शक तक्ता

अ. क्र.

प्रवासी सूचना/ तक्रारी

सूचना / तक्रारीचे माध्यम

सूचना /तक्रार कोणाकडे करावी

तक्रारीबाबत  कार्यवाही

अपिलिय अधिकारी

1

नवीन बस सेवा सुरु करणे, बस सेवेचा मार्ग/ वेळ / सेवाप्रकार बदल करणे  इ.

लेखी निवेदन, तोंडी सूचना / प्रवासी तक्रार पुस्तक इ.

संबंधित विभाग नियंत्रक

विभाग नियंत्रक यांचेकडून  लेखी कळविण्यात येईल.

प्रादेशिक व्यवस्थापक, महाव्यवस्थापक (वाहतूक)

2

बसस्थानकावरील उपहारगृह व इतर आस्थापनांचा निकृष्ट दर्जा, अवाजवी दर इ. बाबत.

उपहारगृहात ठेवलेले तक्रार पुस्तक, बसस्थानकावरील तक्रार पुस्तक, लेखी तक्रार इ.

संबंधित स्थानक प्रमुख / आगार प्रमुख

संबंधित आगार प्रमुख यांचेकडून लेखी कळविण्यात येईल.

संबंधित विभाग नियंत्रक

3

बसस्थानकावरील प्रसाधनगृहाचा दर्जा / कर्मचारी वर्तणूक / वापरणावळ आकाराबाबत

स्वच्छतागृहात ठेवलेले तक्रार पुस्तक, स्थानकावरील तक्रार पुस्तक, लेखी निवेदन इ.

संबंधित स्थानक प्रमुख / आगार प्रमुख

संबंधित आगार प्रमुख यांचेकडून कळविण्यात येईल.

संबंधित विभाग नियंत्रक

4

बसस्थानक स्वच्छता.

बसस्थानकावरील तक्रार पुस्तक, लेखी निवेदन इ.

संबंधित स्थानक प्रमुख / आगार प्रमुख

संबंधित आगार प्रमुख यांचेकडून कळविण्यात येईल.

संबंधित विभाग नियंत्रक

5

पिण्याचे पाणी, उद्धोषणा व बसस्थानकावरील इतर सुविधांबाबत.

बसस्थानकावरील तक्रार पुस्तक, लेखी निवेदन इ.

संबंधित स्थानक प्रमुख / आगार प्रमुख

संबंधित आगार प्रमुख यांचेकडून कळविण्यात येईल.

संबंधित विभाग नियंत्रक

6

नैमित्तिक कराराबाबत तक्रार / सूचना

आगार व्यवस्थापक यांचेकडे निवेदनाद्वारे

संबंधित आगार प्रमुख

संबंधित आगार प्रमुख यांचेकडून कळविण्यात येईल.

संबंधित विभाग नियंत्रक

7 प्रवास भाडे सवलत न मिळणे, पासेस न मिळणे इ.बाबत. बसस्थानकावरील तक्रार पुस्तक, लेखी निवेदन इ. संबंधित स्थानक  प्रमुख / आगार प्रमुख संबंधित आगार प्रमुख यांचेकडून कळविण्यात येईल. संबंधित विभाग नियंत्रक
8 अपघात नुकसान भरपाई बाबत ज्या विभागाची बस आहे त्या विभाग नियंत्रकाकडे अथवा अपघात हाताळणाऱ्या आगार व्यवस्थापकाकडे लेखी  निवेदनाद्वार संबंधित विभाग नियंत्रक / आगार व्यवस्थापक संबंधित विभाग नियंत्रक / आगार व्यवस्थापक यांचेकडून कार्यवाही करण्यात येईल प्रादेशिक व्यवस्थापक
9 रा.प.बसमधील स्वच्छता, चालक /वाहक यांची वर्तणूक इ.बाबत   कर्तव्यावरील वाहकाकडील तक्रार पुस्तक, बसस्थानकावरील तक्रार पुस्तक. संबंधित बसस्थानक प्रमुख / आगार प्रमुख आगार व्यवस्थापक यांचेकडून कळविण्यात येईल विभाग नियंत्रक
10 प्रवास भाडे परताव्याबाबतची तक्रार अर्जाद्वारे संबंधित आगार व्यवस्थापक आगार व्यवस्थापक यांचेकडून कळविण्यात येईल विभाग नियंत्रक
11 बसमध्ये राहिलेल्या सामानाबाबत चौकशी / तक्रार लेखी अर्जाद्वारे संबंधित बसस्थानक प्रमुख / आगार प्रमुख आगार व्यवस्थापक यांचेकडून कळविण्यात येईल विभाग नियंत्रक
12 महामंडळाने नियुक्त केलेल्या एजन्सीज / एजन्ट्स  यांचेबाबत लेखी अर्जाद्वारे आगार व्यवस्थापक / विभाग नियंत्रक आगार व्यवस्थापक यांचेकडून कळविण्यात येईल विभाग नियंत्रक


सुरक्षित व आरामदायी प्रवासाकरिता मार्गदर्शक सूचना

(1) मोटार वाहन नियम 102 (2)(8) नुसार बसमध्ये धुम्रपान करण्यास मनाई आहे.
(2) मोटार वाहन नियम 102 (2)(8) नुसार स्फोटक व ज्वालाग्रही पदार्थ नेण्यास बंदी आहे.
(3) मोटार वाहन नियम 102 (2)(7) नुसार बसमध्ये थुंकण्यास मनाई आहे.
(4) मोटार वाहन नियम क्र.102 (1)(5) नुसार बसमध्ये वाद्य वाजविण्यास मनाई आहे.
(5) बसच्या दरवाज्यातून अगर खिडकीमधून शरीराचा कोणताही भाग बाहेर काढू नका.
(6) बस चालू असताना बस चालकाशी बोलू नका.
(7) ज्या थांब्यावर हमाल नसेल अशा ठिकाणी सामानाची चढ - उतार करण्यास वाहक मदत करेल.
(8) कृपया प्रवास भाडयाचे योग्य पैसे द्या व तिकिटाचा आग्रह धरा. त्याचप्रमाणे दिलेले तिकीट उचित मुल्याचे असल्याची खात्री करा. वाहकाने दिलेले तिकीट प्रवास संपेपर्यंत प्रवाशांनी स्वत:कडे ठेवणे व तपासनीसांना मागणी केल्यावर दाखविणे बंधनकारक आहे.
(9) रा.प.बसमधून विनातिकीट प्रवास करणे हा मोटार वाहन कायदा 1988 मधील कलम 178 (1) व कलम 200(1) अन्वये गुन्हा आहे. यानुसार प्रवाशास रु.100/- किंवा चुकविलेल्या प्रवास भाडेरकमेच्या दुप्पट यापैकी जी जास्त असेल ती रक्कम दंडापोटी वसूल करण्यात येईल. याखेरीज चुकविलेले प्रवास भाडेसुध्दा वसूल करण्यात येईल. प्रवाशाने भाडे दिलेले असो वा नसो,जर संबंधित प्रवासी विनातिकीट आढळला तर त्याचेकडून नियमाप्रमाणे दंडाची वसुली करण्यात येते.
(10) चालत्या बसमध्ये चढ - उतार करु नये.
(11) बेवारस वस्तू आढळल्यास त्वरीत वाहक/स्थानकप्रमुख यांचे निदर्शनास आणावी. अशा वस्तुस स्पर्श करु नये.

पार्सल कुरियर योजना
नागरिकांना त्यांच्याकडील वस्तु/सामान एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी जलदरित्या पाठविणेकरिता एस.टी. महामंडळाच्या यंत्रणेचा उपयोग होऊ शकतो. त्याचप्रमाणे अशी सुविधा उपलब्ध करुन दिल्यास महामंडळासही अधिकचे उत्पन्न प्राप्त होते. ही बाब विचारात घेऊन सुरुवातीच्या कालावधीपासून प्रवासी वाहतूकीसमवेत पार्सल वाहतूक सेवा उपलब्ध करुन देण्यांत आलेली आहे. या योजनेकरिता महामंडळाने संपूर्ण राज्याकरिता एकमेव खाजगी एजंटची नियुक्ती केलेली असून पार्सल सेवा वाहतूकीचे दर ठरविणे, व इतर अनुषंगिक अधिकार खाजगी एजंटसना देण्यांत आलेले आहेत. महामंडळाच्या सर्व प्रमुख बसस्थानकांवर पार्सल कार्यालये असून त्याद्वारे नागरिकांना सक्षम पार्सल सेवा पुरविण्यांत येते.
 
2010, MSRTC. All rights reserved. Site developed by National Informatics Centre, Navi Mumbai.