M.S.R.T.C. Buses
   
 
प्रकरण-1 नवीन बस सेवा सुरु करण्याची कार्यपध्दती
प्रकरण-2 रा.प.बसस्थानकांवरील सोयी सुविधा
प्रकरण-3 आकर्षक आरामदायी सेवा
प्रकरण-4 विविध सेवाप्रकारनिहाय भाडे दरपत्रक
प्रकरण-5 प्रवाशांना एस.टी. सेवेकडे आकर्षित करण्याकरिता प्रवासभाडे सवलत योजना
प्रकरण-6 आगाऊ आरक्षण सुविधा
प्रकरण-7 प्रासंगिक / नैमित्तिक करारावर बसची मागणी
प्रकरण-8 सवलत
प्रकरण-9 यात्रा उत्सव प्रवासी गर्दीचा हंगाम कालावधीत जादा प्रवासी वाहतूक व सामाजिक बांधिलक
प्रकरण-10 रा.प.महामंडळाच्या बसमधील राखीव आसन व्यवस्था
प्रकरण-11 रा.प.बसस्थानकावरील सामान वाहतुकीची/ हमालीची कार्यपध्दती व दर
प्रकरण-12 प्रवासी सामान वाहतुकीचे / हमालीचे दर
प्रकरण-13 प्रवाशाचे गहाळ झालेले व जमा असलेले असे सामान प्रवाशांना परत देण्याची कार्यपध्दती
प्रकरण-14 प्रवास भाडे परतावा  - नियम व कार्यपध्दती
प्रकरण-15 मार्गस्थ बिघाड
प्रकरण-16 प्रवासी तक्रार व सूचना
प्रकरण-17 अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांद्वारे प्रवास न करणेबाबत
प्रकरण-18 वार्षिक सवलत कार्ड योजना
 
 
नागरिक सनद - प्रकरण-15
 
मार्गस्थ बिघाड

मार्गावर धावणा-या बसेस यांत्रिकदृष्टया सक्षम असतील आणि त्याद्वारे विनाव्यत्यय / बिघाड विरहित प्रवासी सेवा पुरविण्याबाबत सर्वतोपरी दक्षता घेण्यात येते. या अंतर्गत महामंडळाने एस.टी. बसेसच्या यांत्रिकी तपासणीचा कालबध्द कार्यक्रम तयार केलेला आहे. रा.प. बस मार्गावरुन आगारात आल्यावर बसच्या कामगिरीवरील चालकास बसमध्ये यांत्रिकी दोष निदर्शनास आल्यास, त्याची नोंद तो दोष पत्रिकेवर नोंदवितो. त्याचप्रमाणे, यांत्रिकी कर्मचा-यांना बसेसच्या देखभालीमध्ये आढळलेले दोष व चालकाने नोंदविलेले दोष तात्काळ दूर करण्यांत येतात. तसेच बसेसच्या सर्व जोडण्या, सर्व यंत्रणा (विद्युत, इंधन, ट्रान्समिशन, इत्यादि) तपासणी करण्यांत येऊन त्यांची देखभाल करण्यांत येते. तदनंतर वाहन तपासूनच मार्गावर पाठविण्यांत येते.

वरीलप्रमाणे दक्षता घेऊनही काही प्रसंगी मार्गात बस बिघाड होत असतात. अशा अपवादात्मक स्थितीत मार्गात वाहन बिघाड झाल्यास व बसमधील बिघाड चालकास दुरुस्त करणे शक्य असल्यास, कामगिरीवरील चालकाकडूनच बसची दुरुस्ती करण्यांत येते. अन्यथा, नजिकच्या आगाराकडून बिघाडाची माहिती मिळताच तात्काळ मदत पथक पाठविण्यांत येऊन बस दुरुस्त करुन मार्गस्थ करण्यांत येते.
 
2010, MSRTC. All rights reserved. Site developed by National Informatics Centre, Navi Mumbai.