एस.टी. प्रवास भाडे सवलत
 
समाजातील विविध सामाजिक घटकांना सामाजिक बांधिलकीच्या नात्याने एस.टी.महामंडळाने सुरुवातीच्या कालावधीपासून प्रवास भाडे सवलत प्रदान केलेली आहे. या प्रवास भाडे सवलतीद्वारे महामंडळाने राज्यातील सर्व घटकांचा सर्वंकष विकास व्हावा याकरिता धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे. विशेषत: विद्यार्थीवर्गास विविध कारणांसाठी प्रवास भाडे सवलत अनुज्ञेय करुन राज्यातील साक्षरतेचे प्रमाण वाढून राज्याच्या प्रगतीस हातभार लावलेला आहे. त्याचप्रमाणे, स्वातंत्र्य सैनिक, दलितमित्र पुरस्कार्थी, आदिवासी सेवक, लोक शाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार्थी इत्यादी समाज सेवेत सातत्याने काम करणाऱ्या पुरस्कार्थी व्यक्तींना विनामूल्य एस.टी.प्रवास सवलत अनुज्ञेय करुन राज्यातील समाज सेवकांचा यथोचित गौरव केलेला आहे. सामाजिक बांधिलकीच्या नात्याने प्रदान करण्यात आलेल्या एस.टी.प्रवास भाडे सवलतींचा तक्ता पुढीलप्रमाणे

राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस मधून सामाजिक बांधिलकीच्या नात्याने देण्यात येणा-या प्रवास भाडे सवलत माहिती विषयक तक्ता.

अ.क्र. सवलतधारक समाज घटकाचा तपशील - सेवा प्रकार / सवलत टक्केवारी सवलतीकरिता आवश्यक  पूर्तता / कागदपत्रे सवलत कोणत्या प्रवासासाठी अनुज्ञेय करण्यात आलेली आहे त्याचा तपशील सवलत देणारा  अधिकारी / कर्मचारी सवलत विहित कालावधीत प्रदान न केल्यास ज्याच्याकडे तक्रार करता येईल असा अधिकारी.  
1 शालेय विद्यार्थी सवलत -66.66% साधी बस प्रवास भाडे सवलत. शैक्षणिक संस्थेचे मुख्याध्यापक / प्राचार्य यांनी प्रमाणीत केलेला विहित अर्ज ज्यावर सवलतधारकाचा फोटो आवश्यक आहे. शिक्षण संस्थेत जाण्या - येण्याकरिता. प्रत्यक्ष प्रवासाच्या वेळी महामंडळाने दिलेले ओळखपत्र / पास दाखविणे अनिवार्य. संबंधित स्थानकप्रमुख /  आगार व्यवस्थापक संबंधित आगार व्यवस्थापक/विभाग नियंत्रक
2 तंत्र शिक्षणअंतर्गत शिक्षण घेणारे विद्यार्थी - 66.66% / 50(((% )))साधी बस प्रवास भाडे सवलत. मुख्याध्यापक / प्राचार्य यांनी प्रमाणीत केलेला विहित अर्ज ज्यावर सवलतधारकाचा फोटो आवश्यक आहे. शिक्षण संस्थेत जाण्या - येण्याकरिता. प्रत्यक्ष प्रवासाच्या वेळी महामंडळाने दिलेले ओळखपत्र / पास दाखविणे अनिवार्य.  संबंधित स्थानकप्रमुख/  आगार व्यवस्थापक संबंधित आगार व्यवस्थापक /           विभाग नियंत्रक
3 5 वी ते 10 वी अंतर्गत शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण विद्यार्थीनींसाठी - 100% साधी बस प्रवास भाडे सवलत. शैक्षणिक संस्थेचे मुख्याध्यापक / प्राचार्य यांनी प्रमाणीत केलेला विहित अर्ज ज्यावर सवलतधारकाचा फोटो आवश्यक आहे. शिक्षण संस्थेत जाण्या - येण्याकरिता. प्रत्यक्ष प्रवासाच्या वेळी महामंडळाने दिलेले ओळखपत्र / पास दाखविणे अनिवार्य. संबंधित स्थानकप्रमुख/  आगार व्यवस्थापक संबंधित आगार व्यवस्थापक /           विभाग नियंत्रक
4 65 वर्षांवरील जेष्ठ नागरिक - 50% साधी बस प्रवास भाडे सवलत 1. तहसीलदाराने दिलेले जेष्ठ नागरिक ओळखपत्र
2. निवडणूक आयोगाने दिलेले ओळखपत्र
3.एस.टी.महामंडळाने पूर्वी दिलेले ओळखपत्र (सध्या सदर ओळखपत्र देण्यात येत नाही)
शिक्षण संस्थेत जाण्या - येण्याकरिता. प्रत्यक्ष प्रवासाच्या वेळी महामंडळाने दिलेले ओळखपत्र / पास दाखविणे अनिवार्य.
विनाअट, सर्व कारणांसाठी केलेल्या प्रवासासाठी ग्राहय. प्रत्यक्ष प्रवासाच्या वेळी ओळखपत्र दाखवून सवलत प्राप्त करता येते.
कर्तव्यावरील रा.प.वाहक स्थानक प्रमुख, आगार व्यवस्थापक  
5 स्वातंत्र्य सैनिक व त्यांचा एक साथीदार-100% साधी, निमआराम, आराम बस प्रवास  संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झालेली यादी, स्वातंत्र्य सैनिक ओळखपत्र.  या आधारे एस.टी.महामंडळाचे ओळखपत्र देण्यात येते.   विनाअट सर्व कारणांसाठी केलेल्या प्रवासासाठी प्रवास सवलत. सदर ओळखपत्र प्रत्यक्ष प्रवाशाच्या वेळी वाहकास दाख्विणे आवश्यक कर्तव्यावरील रा.प.वाहक स्थानक प्रमुख, आगार व्यवस्थापक 
6 अंध, अपंग प्रवासी. - 75% साधी बस प्रवास भाडे सवलत समाजकल्याण अधिकारी यांनी दिलेले अपंगत्वाचे ओळखपत्र ज्यावर आगार व्यवस्थापक यांची सही शिक्का आहे. सदर सवलत विनाअट कोणत्याही प्रवासासाठी देण्यात येते. प्रत्यक्ष प्रवासाच्या वेळी ओळखपत्र पाहून वाहक सवलत देतो. कर्तव्यावरील रा.प.वाहक स्थानक प्रमुख, आगार व्यवस्थापक 
7 अंध, अपंगांमुळे पूर्णत: परावलंबी प्रवाशांचे साथीदार - 50% साधी बस प्रवास भाडे सवलत अपंग व्यक्ती समवेतच सदर साथीदार सवलत घेऊ शकतो. त्याकरिता क्र.6मध्ये नमूद केलेले ओळखपत्र आवश्यक आहे. या ओळखपत्रामध्ये अपंग व्यक्ती पूर्णत: परावलंबी असल्याचा उल्लेक असणे आवश्यक आहे.   प्रत्यक्ष प्रवासाच्या वेळी ओळखपत्र पाहून व अपंग व्यक्ती सोबत असल्याची खात्री करुन वाहक सवलत देतो. कर्तव्यावरील रा.प.वाहक स्थानक प्रमुख, आगार व्यवस्थापक 
8 आदिवासी सेवक पुरस्कार्थी व एक साथीदार - 100% साधी, निमआराम व आराम बस   जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांची यादी व त्या आधारे महामंडळ ओळखपत्र देते. सदर ओळखपत्र प्रत्यक्ष प्रवासाच्या वेळी वाहकास दाखविणे आवश्यक आहे.   रा.प.महामंडळाचे ओळखपत्र दिल्यानंतर सवलत देण्यात येते. विनाअट प्रवासासाठी सवलत. कर्तव्यावरील रा.प.वाहक स्थानक प्रमुख, आगार व्यवस्थापक 
9 शासन अधिस्वीकृतीधारक पत्रकार - साधी, निमआराम बस - साधी बस 8000 कि.मी.प्रवास भाडे मर्यादित सवलत जिल्हा माहिती अधिकारी यांचेकडून यादी व अधिस्वीकृती ओळखपत्र इत्यादी तपशील प्राप्त झाल्यावर महामंडळाकडून ओळखपत्र व सवलत कुपन्स  देण्यात येतात.  रा.प.महामंडळाचे ओळखपत्र व सवलत कुपन्स प्रत्यक्ष प्रवासाच्या वेळी  दिल्यानंतर सवलत देण्यात येते.  कर्तव्यावरील रा.प.वाहक स्थानक प्रमुख, आगार व्यवस्थापक 
10 माजी विधानमंडळ सदस्य व त्यांचा एक साथीदार -  सर्व प्रकारच्या बसेसमधून 100% विनामूल्य सवलत विधानमंडळ सचिवालयाने दिलेल्या ओळखपत्राच्या आधारे सवलत देण्यात येते.  प्रत्यक्ष प्रवासाच्या वेळी   सवलत देण्यात येते. याकरिता विधानमंडळ सचिवालयाचे ओळखपत्र दाखविणे आवश्यक आहे  रा.प.वाहक स्थानक प्रमुख, आगार व्यवस्थापक 
11 शैक्षणिक प्रासंगिक कराराकरिता सवलत - 66.66% साधी बस प्रवास सवलत शैक्षणिक संस्था प्रमुखाने विहित नमुन्यातील अर्ज व त्या समवेत प्रमाणित केलेल्या प्रवास करु इच्छिणाऱ्या विद्यार्थी / विद्यार्थीनी / शिक्षकांची यादी. सदर सवलत रा.प.बसेसच्या उपलब्धतेनुसार देण्यात येते. सदर सवलत शैक्षणिक सहलिंकरिता व बसेसच्या उपलब्धतेनुसार कमी गर्दीच्या हंगामात देण्यात येते. आगार व्यवस्थापक संबंधित विभाग नियंत्रक
12 कुष्ठ रोगी - 75% साधी बस प्रवास भाडे सवलत सदर सवलतीसाठी वैद्यकीय अधिकाऱ्याचे विहित केलेल्या नमुन्यातील प्रमाणपत्र आवश्यक आहे. पाच वर्षाखालील कुष्ठ रोग्याच्या सह प्रवाशास सवलत देण्यात येते. सदर सवलत वैद्यकीय उपचार, वैद्यकीय शिबीर इ.करणांसाठी देण्यात येते.वैद्यकीय अधिकारी यांचा दाखला प्राप्त झाल्यावर त्यानुसार सवलत अनुज्ञेय करणेबाबतचे आदेश संबंधित स्थानक प्रमुख अर्जावर देतात व त्यानुसार रा.प.वाहक प्रत्यक्ष प्रवासाच्या वेळी अर्जाची छाननी करुन प्रवास भाडे सवलत देतो.  कर्तव्यावरील रा.प.वाहक स्थानक प्रमुख, आगार व्यवस्थापक .
13 क्षय व क रोगी - 50% साधी बस प्रवास भाडे सवलत  सदर सवलत अर्ज व त्या समवेत वैद्यकीय अधिकारी यांचा दाखला आवश्यक आहे.  सदर सवलत वैद्यकीय उपचार व पुनर्वसन शिबीर या कारणांसाठी देण्यात येते. अर्ज प्राप्त झाल्यावर त्याची पडताळणी करुन स्थानकप्रमुख  स्वाक्षरी देतात.   स्थानक प्रमुखाने केलेल्या स्वाक्षरी वरील अर्जाच्या आधारे रा.प.वाहक प्रत्यक्ष प्रवासाच्या वेळी सवलत देतो. स्थानकप्रमुख / आगार व्यवस्थापक
14 अर्जुन, द्रोणाचार्य  पुरस्कार विजेते - रु.500 प्रवास भाडे सवलत प्रतिवर्षी जिल्हा क्रीडा अधिकारी यांची यादी व शासनाचे ओळखपत्र आवश्यक आहे. त्या आधारे महामंडळाकडून ओळखपत्र व रु.500/- चे कुपन्स देण्यात येतात. जिल्हा क्रीडा अधिकारी यांची यादी प्राप्त झाल्यानंतर कुपन्स देण्यात येतात. विनाअट प्रवासाकरिता सवलत अनुज्ञेय. प्रत्यक्ष प्रवासाच्या वेळी ओळखपत्र व कुपन्स रा.प.वाहकास दाखविणे व देणे आवश्यक आहे. स्थानकप्रमुख / आगार व्यवस्थापक
155 शासकीय क्रिडा स्पर्धा - 33.33% साधी बस प्रवास सवलत सक्षम प्राधिकारी यांचे पत्र व त्या समवेत सवलतीकरिता अर्ज.  अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्यावर स्थानक प्रमुख सही शिक्का देऊन सवलत देणेबाबतचे आदेश देतात. सदर सवलत फक्त शासकीय क्रिडा स्पर्धेत विजेत्या असलेल्या संघातील स्पर्धक व संबंधितांस देण्यात येते. सदर सवलत मुळ ठिकाण पासून ते स्पर्धेच्या ठिकाणापर्यंत प्रवासासाठी सवलत देण्यात येते. प्रत्यक्ष प्रवासाच्या वेळी रा.प.वाहक कागदपत्रांची पडताळणी करुन सवलत देतो.  स्थानकप्रमुख / आगार व्यवस्थापक
16 शैक्षणिक क्रिडा स्पर्धा- 50% साधी बस प्रवास सवलत सक्षम प्राधिकारी यांचे पत्र व त्या समवेत सवलतीकरिता अर्ज. अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्यावर स्थानक प्रमुख सही शिक्का देऊन सवलत देणेबाबतचे आदेश देतात. मुळ ठिकाणापासून ते स्पर्धेच्या ठिकाणापर्यंत प्रवासासाठी सवलत देण्यात येते. प्रत्यक्ष प्रवासाच्या वेळी रा.प.वाहक कागदपत्रांची पडताळणी करुन सवलत देतो.  स्थानकप्रमुख / आगार व्यवस्थापक
17 आजारी आई वडीलांना भेटण्यासाठी विद्यार्थ्यांकरिता - 50% साधी बस प्रवास सवलत सक्षम प्राधिकारी, शैक्षणिक संस्थाप्रमुखाने दिलेला अर्ज.  अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्यावर स्थानक प्रमुख सही शिक्का देऊन सवलत देणेबाबतचे आदेश देतात. शिक्षण संस्थेच्या गावापासून ते आई वडील राहतात त्या गावी जाण्या - येण्यासाठी. प्रत्यक्ष प्रवासाच्या वेळी रा.प.वाहक कागदपत्रांची पडताळणी करुन सवलत देतो.  स्थानकप्रमुख / आगार व्यवस्थापक
18 शैक्षणिक विद्याथ्यर्ांकरिता कॅम्पला जाण्या-येण्यासाठी - 50% साधी बस प्रवास सवलत सक्षम प्राधिकारी, शैक्षणिक संस्थाप्रमुखाने दिलेला अर्ज.   अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्यावर स्थानक प्रमुख सही शिक्का देऊन सवलत देणेबाबतचे आदेश देतात. शैक्षणिक शिबीर, कॅम्प यासाठी शिक्षण संस्थेच्या गावापासून ते शिबीर आयोजित केलेल्या गावापर्यंतच्या प्रवासासाठी. प्रत्यक्ष प्रवासाच्या वेळी रा.प.वाहक कागदपत्रांची पडताळणी करुन सवलत देतो.  स्थानकप्रमुख / आगार व्यवस्थापक
19 विद्यार्थ्यांकरिता मोठया सुटृटीत घरी जाण्या - येण्यासाठी  50% साधी बस प्रवास सवलत शिक्षण संस्थाप्रमुखाने प्रमाणित केलेला अर्ज.  अर्ज प्राप्त झाल्यावर स्थानक प्रमुख  एस.टी.प्रवास भाडे सवलत अनुज्ञेय करावी याकरिता सही शिक्का देतात.शिक्षण संस्थेच्या गावापासून ते मुळ गावी जाण्या -येण्याकरिता. स्थानक प्रमुख.  आगार व्यवस्थापक
20 दलित मित्र पुरस्कार्थी व एक साथीदार - 100% साधी, निमआराम व आराम बस प्रवास सवलत जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांची यादी आवश्यक आहे. त्या आधारे महामंडळाकडून प्रवास भाडे सवलतीसाठी आवश्यक ओळखपत्र देण्यात येते.  महामंडळाने दिलेल्या ओळखपत्राची खातरजमा प्रत्यक्ष प्रवासाच्या वेळी रा.प.वाहकाकडून करण्यात येऊन त्या आधारे सवलत देण्यात येते. सदर सवलत विनाअट प्रवासासाठी अनुज्ञेय आहे.  कर्तव्यावरील रा.प.वाहक स्थानक प्रमुख / आगार व्यवस्थापक 
21 लोकशाहीर अंण्णाभाऊ साठे पुरस्कार्थी व एक साथीदार - 100% साधी निमआराम व आराम बस प्रवास सवलत जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांची यादी आवश्यक आहे. त्या आधारे महामंडळाकडून प्रवास भाडे सवलतीसाठी आवश्यक ओळखपत्र देण्यात येते.  महामंडळाने दिलेल्या ओळखपत्राची खातरजमा प्रत्यक्ष प्रवासाच्या वेळी रा.प.वाहकाकडून करण्यात येऊन त्या आधारे सवलत देण्यात येते.सदर सवलत विनाअट प्रवासासाठी अनुज्ञेय आहे.  कर्तव्यावरील रा.प.वाहक स्थानक प्रमुख / आगार व्यवस्थापक 
22 शासकीय पूजेचा मान प्राप्त वारकरी दाम्पत्यास 8000 कि.मी.साधी बस प्रवास भाडे दराची साधी बस व निमआराम प्रवास सवलत शासकीय पूजेचा मान मिळाल्याबाबत संबंधित शासकीय अधिकाऱ्याचे पत्र.  शासनाचे पत्र प्राप्त होताच किंवा पूजेच्या वेळीच मा.मुख्य मंत्री / उपमुख्य मंत्री यांचे हस्ते सवलतीकरिता आवश्यक ओळखपत्र व कुपन्स देण्यात येतात.  सदर सवलत राज्यातील तिर्थक्षेत्रांना / धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठी  नुज्ञेय आहे.   प्रत्यक्ष प्रवासाच्या वेळी रा.प.वाहक ओळखपत्र व कुपन्स तपासून घेऊन प्रवास भाडे सवलत दिली जाते. स्थानक प्रमुख / आगार व्यवस्थापक 
23 रेस्क्यू होममधील मुलांकरिता 66.66% साधी बस प्रवास सवलत रेस्क्यू होममधील संस्था प्रमुखाने दिलेला व प्रमाणित केलेला अर्ज आवश्यक आहे.   अर्ज प्राप्त होताच, सवलत देण्याबाबतची प्रतिस्वाक्षरी अर्जावर स्थानकप्रमुख करतात.  प्रत्यक्ष प्रवासाच्या वेळी रा.प.वाहक कागदपत्र तपासून प्रवास भाडे सवलत दिली जाते. स्थानक प्रमुख / आगार व्यवस्थापक 
24 विद्यार्थ्यांचे जेवणाचे डबे - 100% प्रवास भाडे सवलत शिक्षण संस्था प्रमुखाने दिलेला विहित नमुन्यातील व प्रमाणित केलेला अर्ज. अर्ज प्राप्त झाल्यावर पास देण्यात येतो. रा.प.वाहक स्थानक प्रमुख
 
2010, MSRTC. All rights reserved. Site developed by National Informatics Centre, Navi Mumbai.