मा.श्री.जीवनराव गोरे
( मंत्री दर्जा )

अध्यक्ष
(म.रा.मा.प.महामंडळ मुंबई)
 
 
अध्यक्षांचे मनोगत
 
मी राज्य परिवहन महामंडळाचा अध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारला आणि अनेक खडतर आव्हानाना आपल्या साथीने सामोरे जायचा निश्चय केला. परिस्थिती कशीही असो, मनस्थिती खंबीर असावी. माझा आत्मिक बळावर , अभ्यासावर आणि सततच्या प्रयत्नावर विश्वास आहे. महामंडळाची सद्यस्थिती कितीही कठीण असली तरी अशक्य असे काहीच नाही. आपण आणि आपल्यातील क्रयशक्ति , आत्मबल आपल्या संस्थेला आर्थिक दुष्टचक्रातुन निश्चीतच बाहेर आणू शकेल, अशी माझी खात्री आहे.

प्रवासी हे आपले दैवत आहे. मग बस आणि स्थानकाचा परिसर देवालया प्रमाणे स्वच्छ असायला हवा. स्वच्छतेला प्रथम प्राध्यान्य द्यायला हवे. तसेच प्रवाशाचा वाटेत खोळंबा होवु नये म्हणून मार्ग बिघाड टाळण्यासाठी पुरेपूर प्रयत्न व्हायला हवेत. महामंडळ हे एक कुटुंब असून या कुटुंबातल्या चालक / वाहक / यांत्रीक या महत्वाच्या घटकानी परस्परात समन्वय ठेवून प्रवाशाना वक्तशीर व सुरक्षित सेवा देण्याचा प्रयत्न करायला हवा. यापुढील काळात आपण सर्वानी जनतेमध्ये महामंडळाविषयी विश्वासार्हता वाढवण्याचे काम एक मिशन म्हणून हाती घ्यावयाचे आहे. मला कामगार प्रश्न व महामंडळाच्या समस्या जाणून घेऊन त्यात व्यक्तिनगत लक्ष घालून त्या सोडविण्याचा प्रयत्न करावयाचा आहे. नवीन गाड्या, कामगार करार आणि मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी निधी उपलब्ध करणे गरजेचे आहे. यासाठी आपण ईच्छाशक्ति , क्रयशक्ति आणि जिद्ध पुरवलीत तर आपण प्रवाशाना सर्वोत्तम सेवा देऊ शकू आणि आपल भविष्य नव्यान लिहु शकू

अधिकारी / कर्मचारी यांचेवर अन्याय होणार नाही याची मी कटाक्षाने काळजी घेणार आहे. आपण समाधानी राहिलात तर महामंडळ उर्जितावस्थेत येईल याची मला जाणीव आहे. यापूर्वी महामंडळ आर्थिक संकटात सापडले असता आपण सर्वानी अथक परिश्रमाने तोटा कमी करून महामंडळ फायद्यात आणण्याचा प्रयत्न केला होता याची मला जाणीव आहे आणि त्याचे मला व्यक्तिशा कौतुक आहे. आपला प्रवासी अत्त्यत सामान्य माणूस आहे आणि सामान्य तसेच तळागाळातल्या प्रवाशांची सेवा करण्याची संधी आपणास लाभली आहे. मग त्याना दर्जेदार सेवा देणे हे आपले कर्तव्य ठरते . तूर्त , स्वच्छता, वक्तशीरपणा आणि सुरक्षितता हे उद्धीष्ट ठेवून काम करू या, एकमेकांच्या साथीने हातात हात घालून महामंडळाच्या उज्वल भवितव्यासाठी एकत्र चालू या. व्यवसाय विश्वासावर चालतो आणि विश्वासाने चालत राहीले की यश हमखास मिळतच! थोड झटाव, झगडाव लागेल , पण खात्रीने आप ण यशाचा पैलतीर गाठू. जिद्ध, चिकाटी आणि श्रम आपल भविष्य घडवेल. आत्मपरीक्षण आणि आत्मविश्वासाने असाध्य सुध्दा साध्य करता येऊ शकते. चला तर मग, विश्वासाचे एक पाउल पुन्हा नव्याने टाकु या , विश्वास निर्माण करू या, आपल्या प्रवाशाना विश्वासात घेऊन, या महामंडळास पूर्वीचे वैभव मिळवून देण्यास कटिबद्ध राहू या.



धन्यवाद ! 
 
2010, MSRTC. All rights reserved. Site developed by National Informatics Centre, Navi Mumbai.